Breaking

Shivbhojan : आघाडी सरकारची ही योजना आजही ठरतेय कष्टकऱ्यांसाठी वरदान!

MVA government’s scheme continues to be a boon still : दहा रुपयांत मिळतेय शिवभोजन, वर्षभरात अडिच लाख लोकांना लाभ

Wardha कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला. अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. हजारो लोकांनी आपल्या गावांची वाट धरली. अशात रेस्टॉरंट, छोट्या-मोठ्या चहाच्या टपऱ्या सारं काही बंद होतं. त्यामुळे उपाशी राहण्याचीही वेळ आली. त्यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दहा रुपयांत पोटभर जेवणाची योजना आणली. ‘शिवभोजन’ या नावाने सुरू झालेली ही योजना आजही कष्टकऱ्यांसाठी योगदान ठरत आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मोफत धान्यासोबतच शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती. या योजनेतून दहा रुपयांत पोटभर जेवण दिले जाते. ही योजना आजही सुरू आहे. महिन्याला १ हजार ९०० ते २ हजार नागरिकांना जेवण दिले जात आहे. गेल्या वर्षभरात २ लाख ४० हजार नागरिकांना शिवभोजनाचा लाभ मिळाला आहे.

Ajit Pawar NCP : गडचिरोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का!

लॉकडाऊन काळात कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना दुपारी पोटभर जेवण मिळावे म्हणून शिवभोजन ही योजना सुरू केली होती. या योजनेचा अनेकांना फायदा झाला आणि आताही होत आहे. बरेच नागरिक ग्रामीण भागातून शहरात विविध कामाकरिता येतात आणि दिवसभर त्यांना भटकावे लागते. त्यामुळे त्यांना नाश्ता करायचा असला तरीही तीस ते चाळीस रुपये मोजावे लागतात. त्यामुळे दहा रुपयांत पोटभर मिळणारे शिवभोजन आजही आधार ठरत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात असलेल्या २३ केंद्रांवरून गरजू व गरिबांचे नियमित पोट भरले जात आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण २३ शिवभोजन केंद्र सुरू आहेत. या केंद्रांवरून जानेवारी ते डिसेंबर २०२४पर्यंत एकूण २ लाख ४० हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये एकूण २७ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली होती. परंतु, शासनाकडून अनुदान देण्यास होणारा विलंब, परिणामी उसनवार करून केंद्र चालविण्याचे वेळ येत होती. यामुळे काहींना यात समन्वय साधता आला नसल्याने त्यांनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे चार केंद्र बंद झाल्याने आता २३ केंद्र सुरू आहेत. याही केंद्रांना तीन ते चार महिन्याआड एकत्र अनुदान मिळत असल्याचे सांगण्यात आले. शिवभोजन थाळीमध्ये वरण, भात, भाजी आणि दोन चपात्या द्याव्या लागतात. याकरिता लाभार्थ्याला दहा रुपये मोजावे लागतात. शासनाकडून केंद्र चालकाला शहरी भागाकरिता ४० रुपये, तर ग्रामीण भागाकरिता २५ रुपये प्रतिथाळी अनुदान मिळते. पण, शासनाकडून दरमहा अनुदान न मिळता तीन ते चार महिन्यांचे एकावेळी दिले जात आहे.

Harshawardhan Sapkal : मढीच्या दुकानदारांना सपकाळ यांनी दिला धीर !

त्यामुळे केंद्र चालकांना तीन ते चार महिने स्वत:जवळून किंवा उसनवार रक्कम घेऊन सोय करावी लागत असल्याने अडचण होते. शासनाने या योजनेचे नियमित अनुदान देण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यात शिवभोजन थाळीची एकूण २७ केंद्र होती. त्यापैकी चार केंद्र बंद झाली आहेत. या केंद्रावरून दरदिवसाला जवळपास २ हजार लाभार्थ्यांना भोजन दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांना डिसेंबरपर्यंतचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात २ लाख ४० हजार लाभार्थ्यांना शिवभोजनाचा लाभ मिळाला आहे.