Truck driver dies after falling asleep while driving : समृद्धी महामार्गावरील अपघातात १ ठार, १ गंभीर जखमी
Wardha अपघातग्रस्त आयशर ट्रकला मागाहून सुसाट येणाऱ्या ट्रेलरने जबर धडक दिली. यामध्ये ट्रेलर चालकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर रेस्क्यू टीममधील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. हा समृद्धी महामार्ग नागपूर कॉरिडाॅर येळाकेळीजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी सेलू पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.
सतनामसिंग कुलवंतसिंग संधू (४१, रा. विक्राेळी) असे मृत ट्रेलर चालकाचे नाव आहे. तर क्यूआरव्ही QRV कर्मचारी प्रतीक राखुंडे (३३, नेमणूक समृद्धी महामार्ग, येळाकेळी) हा गंभीर जखमी झाला आहे. यूपी ४५ एटी ७५७६ क्रमांकाचा ट्रक वापी गुजरात येथून कोलकाता येथे समृद्धी महामार्गाने जात होता. त्यावेळी चालक मोहम्मद समीर मोहम्मद अख्तर (२३, रा. उत्तर प्रदेश) याला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाला.
जाम पोलिस मदत केंद्रातील पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे हे रेस्क्यू टीमसह घटनास्थळी पोहोचले. कार्यवाही करत असताना मागाहून भरधाव आलेल्या ट्रेलरने अपघातग्रस्त ट्रकला धकड दिली. यात चालक सतनामसिंग मृत पावला. तर रेस्क्यू टीममधील कर्मचारी प्रतीक राखुंडे याच्या दोन्ही पायाला गंभीर मार लागला. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
The Prohibition of Child Marriage Act (PCMA) : मांडव पडला, पण अक्षता पडण्यापूर्वीच बालविवाह रोखला!
अपघातग्रस्त ट्रेलरमध्ये लोड केलेला इंजिन ब्लॉक्सचा माल महामार्गावर सर्वत्र पसरलेला होता. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी काही वेळासाठी चॅनेल क्रमांक ४० ते ३८ पर्यंतची वाहतूक डायव्हर्जन करण्यात आली होती. जखमी प्रतीक राखुंडे याला रुग्णवाहिकेने सावंगी रुग्णालयात नेण्यात आले.