Breaking

CM Devendra Fadnavis : ‘एआय अनझीप्ड’ पुस्तकामुळे कार्यक्षमता वाढेल

The book ‘AI Unzipped’ will increase efficiency in daily work : डॉ. अपुर्वा पालकर यांच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Mumbai ‘AI Unzipped’ या पुस्तकातून AI चा दैनंदिन कार्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयोग होईल. कृत्रीम बुध्दीमत्तेमागील अद्यावत तंत्रज्ञान, विद्यार्थीनी, विद्यार्थी व दैनंदिन कामकाजात AI वापरण्यासाठी लोकांना वापर करायला हे पुस्तक उपयोगी पडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.डॉ. अपुर्वा पालकर यांच्या AI Unzipped या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde, कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा आदींची उपस्थिती होती.

CM Devendra Fadnavis : डीप फेक आणि मॉर्फिंग रोखण्यासाठी विशेष नियोजन!

AI चा उपयोग कृत्रीम बुध्दीमत्तेमागील अद्यावत तंत्रज्ञान, कृत्रीम बुध्दीमत्तेचा उद्योग क्षेत्र, आरोग्य सेवा, शिक्षण या क्षेत्रातील उपयोग, AI चा उपयोग कसा व करावा, याची माहिती आहे. तसेच AI च्या 500 हून अधिक Open Source Tools आणि कार्यक्रमांची माहिती देण्यात आलेली आहे. दैनंदिन कामकाजात AI वापरण्यासाठी लोकांना उद्युक्त करायला हे पुस्तक उपयोगी पडेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुस्तकाच्या लेखनाबद्दल कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचे अभिनंदन केले. तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातर्फे विद्यार्थीनी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या Code Without Barriers, AI Inititive with Microsoft ज्यामध्ये 10,000 विद्यार्थीनी व महिलांचे प्रशिक्षण सुरु आहे, याचेही कौतुक केले.

Samruddhi Mahamarg : ट्रक चालवताना डुलकी लागली, काळाची झडप!

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या पुस्तकाचे कौतुक करुन हे पुस्तक नक्कीच सर्व महिला, विद्यार्थीनी, विद्यार्थ्यांना व दैनंदिन कामकाजात AI वापरण्याऱ्या नव उद्योजक, संशोधक यांना उपयोगाचे ठरेल, असे मत व्यक्त केले.