Breaking

Assembly Budget : बुलढाण्याच्या महसूल भवनासाठी १५.७१ कोटी!

15.71 crore for the Mahsul Bhavan of Buldhana : अर्थसंकल्पात मंजुरी, अत्याधुनिक सोयीसुविधांसाठी तरतूद

Buldhana राज्याच्या अर्थसंकल्पात बुलढाण्यातील महसूल भवन उभारणीसाठी १५.७१ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळाला आहे. त्यातून शहराचा कायापालट करण्यातही सरकारला यश आलं आहे. अनेक रस्ते, महापुरुषांचे पुतळे, स्मारके, सौंदर्यीकरण, नाट्यगृह, वारकरी भवन आदींचा यामध्ये समावेश आहे.

मतदारसंघातील संपूर्ण रस्ते, महामानवांचे पुतळे, स्मारक, शहर सौदर्यकरण, सिचंन, नाटयगृह, वारकरी भवन, आरोग्य भवन, मेडीकल कॉलेज, कृषी महाविद्यालय अनेक विषय पुर्णत्वास गेले आहेत. आता जिल्ह्यातील महत्वाच्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या निर्माणकार्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. यात महसूल भवनाच्या कामासाठी १५ कोटी ७१ लाख रुपये सदर इमारतीसाठी मंजूर झाले आहेत.

Sudhir Mungantiwar : सर्व घटकांना सामावून घेणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प  

या प्रस्तावित महसूल भवनाच्या उभारणीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना महसूल संबंधित कामांसाठी सुलभ सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. महसूल भवनाच्या इमारतीत विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. यात आधूनक स्वरुपाचे पार्किंग, सेक्युरीटी कॅबीन, शौचालय, तहसीलदार ऑफीस, पहिल्या मजल्यावर नायब तहसीलदार कार्यालय, सेतू कार्यालय, कॉन्फरन्स रुम, दुसऱ्या मजल्यावर एसडीओ कार्यालय, निवडणूक विभाग कॉप्यूटर रुम, रेकॉर्ड रुम, इव्हीएम स्ट्रांग रुम यांचा समावेश असेल.

Nitin Raut : मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा फोल, अर्थसंकल्पात विदर्भाच्या जनतेवर अन्याय !

तिसऱ्या मजल्यावर लॅन्ड रेकॉर्ड कार्यालय, ॲसेंबली हॉल, स्ट्रांग रुम, सीएससी सेंटर, स्टेनो रुम, रेकॉर्ड रुम यांचा समावेश असेल. चौथ्या मजल्यावर कॅन्टींग, किचन, ऑडीटोरीयम, ग्रीन रुम, व्हीआयपी रुम आणि शौचालय यांचा समावेश असेल. आमदार संजय गायकवाड यांनी भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.