Action against Naxalites the very next day after establishing a police station : भामरागड येथील पोलिसांचे होतेय कौतुक, चार स्मारके उध्वस्त
Gadchiroli नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी अतिरिक्त पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले. अशावेळी नक्षलवाद्यांच्याच टार्गेटवर पोलीस स्टेशन राहण्याची शक्यता असते. पण पोलिसांनी आज ठाणे स्थापन होताच दुसऱ्याच दिवशी नक्षलवाद्यांना जोरदार धक्का दिला. भामरागड तालुक्यातील या कारवाईमध्ये नक्षलवाद्यांची चार स्मारके उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
छत्तीसगड सीमेवरील भामरागड Bhamragad तालुक्यातील कवंडे गावात पोलिस ठाणे स्थापन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या परिसरातील नक्षलवाद्यांची चार स्मारके उध्दवस्थ करण्यात आली. माओवाद्यांचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या कवंडे परिसरात पोलिसांनी अभियान तीव्र केल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
NDA Government Mahayuti : प्रकल्पांसाठी कोट्यवधी, पण शौचालयांची बोंब!
कवंडे गावात पोहोचण्यासाठी पोलिसांना दोन दिवस रस्ता बनविण्यासाठी लागले. त्यानंतर २४ तासांत उभारलेल्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन ९ मार्च रोजी केले. रस्ता तयार करताना या परिसरात अगोदरच्या काळातच माओवाद्यांनीे स्मारके बांधलेली असल्याचे निदर्शनास आले होते. सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी माओवाद्यांकडून सदर स्मारकांची निर्मिती करण्यात आली होती.
यामुळे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी बॉम्बशोधक व नाशक पथक व विशेष अभियानच्या पथकामार्फत परिसरात शोध अभियान राबविले. मिडदापल्ली ते कवंडे रस्त्यावर तसेच कवंडे पोलिस ठाण्याच्या शेजारील परिसरातील माओवाद्यांची चार स्मारके उध्दवस्थ करण्यात आली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतिश देशमुख, एम. रमेश, एम. व्ही. सत्यसाई कार्तिक, उपअधीक्षक विशाल नागरगोजे, अमर मोहिते आदी उपस्थित होते.
माओवाद्यांची पुरती कोंडी
माओवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा, नेलगुंडा व पाठोपाठ कवंडे या छत्तीसगड सीमेवरील गावांमध्ये चालू वर्षी सव्वा तीन महिन्यांत तीन पोलिस ठाण्यांची स्थापना करण्यात आली. माओवाद्यांना हा मोठा धक्का असून त्यांची यामुळे पुरती कोंडी झाली आहे.








