Air connectivity of Western Vidarbha will increase : बेलोरा विमानतळामुळे अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती
Amravati बेलोरा येथील विमानतळाचे Belora Airport काम पूर्ण झाले आहे. ३१ मार्चपासून येथे प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अमरावतीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे पश्चिम विदर्भाची हवाई कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयासाठी आनंद व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांनी राज्याचा आश्वासक अर्थसंकल्प Assembly Budget सादर केला आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यासाठीही महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.
दर्यापूर येथे नवीन न्यायालय उभारण्याची घोषणा करण्यात आली. खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर भागात विशेष प्रकल्प जाहीर झाला. या प्रकल्पांमुळे शेतीसाठी जमीन सुपीक होईल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. तसेच नवीन तंत्रज्ञान आणि पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू केले होते. या अर्थसंकल्पात मराठी भाषा विद्यापीठासाठी उच्च दर्जाचे संकलन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच महानुभाव पंथाच्या ऐतिहासिक रिद्धपूर मंदिरांच्या विकासासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.
Vijay Wadettiwar : पुनर्वसन न करता गावाचा रस्ता खोदलाच कसा ?
या अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीमुळे अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास वेग घेईल, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री या नात्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले.