Breaking

Vijay Wadettiwar : अर्थसंकल्पात ग्रामीण महाराष्ट्र कुठे आहे ?

 

Vijay Wadettiwar exposes Ajit Pawar’s budgetआधी मुंबई, पुणे अन् मग उरलं तर नागपूर

अर्थमंत्री अजित पवार यांच्या कालच्या (१० मार्च) अर्थसंकल्पीय भाषणात पहिली २५ मिनीटं कंत्राटदारांसाठी होती. यामध्ये इन्फ्रास्ट्रॅक्टर प्रकल्पांच्याच घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक सगळे खुश झाले. पण ह्यात ग्रामीण महाराष्ट्र कुठे आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

हा अर्थसंकल्प म्हणजे मुंबई पुणे आणि उरले तर नागपूर, असाच असल्याचीही टिका त्यांनी केली. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचा समतोल विकास होणार नाही. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात उद्योग क्षेत्राचा विकास दर ६.२ टक्क्यावरून ४.९ टक्के होण्याचा अंदाज आहे. राज्यात २०२२ मध्ये बेरोजगारांची संख्या ५८ लाख ७८ हजार होती, २०२३ मध्ये ६२ लाख ७८ हजार झाली तर २०२४ तर २०२४ मध्ये बरोजगारांची संख्या ७० लाख ६३ हजारपर्यंत वाढली.

Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे यांनी पायावर धोंडा मारून घेतला !

दावोस मध्ये जाऊन इतकी गुंतवणूक आली, असं सांगितलं जात आहे. तर मग रोजगार निर्माण होणार, हा जुमला आहे का? असाही प्रश्न वडेट्टीवर यांनी उपस्थित केला. २०२५ पर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी एक ट्रिलियन डॉलर होणार असे वक्तव्य २०१८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आता मुख्यमंत्री म्हणत आहेत की, एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी २०२८ पर्यंत होणार.

Devendra Fadanvis : होय..! धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत !

सध्या महाराष्ट्राची इकॉनॉमी ४२ कोटींची आहे. वर्षाला साधारण इकॉनॉमी ४ ते ५ कोटी वाढत आहे. असे असताना २०२८ मध्ये एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार कशी? त्याचा रोडमॅप कसा आहे? व्हिजन काय, याचे कुठलेही प्रतिबिंब अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात नाही. महायुती सरकारच्या काळात अर्थव्यवस्था नाही तर फक्त भ्रष्टाचारामध्ये दुप्पट वाढ झाली आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.