Bank employees protest against government policy : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने
Akola देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अकोला शहरातील कॅनरा बँक दामलेवाडी शाखेसमोर मंगळवारी (१९ मार्च) शेकडो बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने व जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार, वित्तीय सेवा विभाग आणि इंडियन बँक असोसिएशनकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. जर मागण्यांची दखल घेतली नाही, तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
Protest in Amravati : गुन्हे दाखल असूनही शिक्षक बँक संचालक मंडळ कार्यरत
कर्मचारी भरती: रिक्त पदे तातडीने भरावीत. पाच दिवसांचा आठवडा: बँक कर्मचाऱ्यांसाठी शनिवार-रविवार सुट्टी लागू करावी. जुनी पेन्शन योजना: जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करावी. सुरक्षा व्यवस्था: बँक कर्मचाऱ्यांसाठी योग्य सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी. करसवलत: सरकारी कर्मचाऱ्यांच्या योजनेप्रमाणे ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा २५ लाखांपर्यंत करमुक्त करावी, या प्रमुख मागण्या आहेत.
बँकिंग क्षेत्रातील धोरणे: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कर्मचारी व अधिकारी संचालकांची पदे भरावीत. आऊटसोर्सिंगचा निषेध: बँकिंग उद्योगातील आऊटसोर्सिंग आणि कामगारविरोधी धोरणांना विरोध. आयडीबीआय बँकेत गुंतवणूक: सरकारने आयडीबीआय बँकेत किमान ५१% इक्विटी भांडवल ठेवावे. कल्याणकारी लाभांवरील कर: कर्मचारी कल्याणकारी योजनांवरील कराचा भार बँक व्यवस्थापनाने उचलावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
MLA Manoj Kayande : पाणी टंचाईच्या बैठकीला अधिकाऱ्यांचा दुष्काळ!
या आंदोलनात २०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रवीण महाजन, आशिष गोसावी, अमृत राठोड, दीपक लबडे, अमोल काटे, उमेश शेळके, अमोल इंगळे, अभिजित देशमुख, राहुल रायबोले, केवल ठाकूर, सचिन पाटील, कॉम. जोशी, देशमुख, शुभांगी मानकर, शिल्पा ढोले, महेंद्र चौधरी यांच्यासह विविध बँकांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.