MLA Sanjay Meshram told the House the reality of the coal handlink depot : आमदार संजय मेश्राम यांनी सभागृहाला सांगितले कोल हॅन्डलिंक डेपोचे वास्तव
Mumbai : नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील आमनदी पात्राच्या किनाऱ्याजवळ कोल हॅन्डलिंक डेपो प्रस्तावित आहे. ही जागा अगदी शहराला लागून आहे आणि हा डेपो येथे झाल्यास संपूर्ण उमरेड शहर उद्धस्त होईल, अशी भीती उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी सभागृहात व्यक्त केली. हा डेपो होऊ नये, यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
विधानसभेत आज (१२ मार्च) लक्षवेधीवर बोलताना आमदार मेश्राम चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले, येथे इन्फ्रास्ट्रक्चर महारेल विकसीत करत आहे. कोळसा वेकोलि Western Coalfields Ltd देणार आहे. पण हा डेपो आहे कुणाचा, याबद्दल कुणालाही काहीही माहिती नाही. कोल हॅन्डलिंक करताना कोळशाची धूळ मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्याचा त्रास संपूर्ण उमरेड शहराला होणार आहे.
या प्रकल्पाला ग्रामपंचायतीपासून ते उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत कुणीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाला मान्यता कुणी दिली, हा प्रश्न उपस्थित होतो. काहीही झाले तरी हा प्रकल्प सुरू होता कामा नये. कारण नुकताच महामार्गाच्या केवळ ३०० मीटर अंतरावर असाच एक डेपो सुरू झाला. त्या परिसरात ३ इंच कोळशाच्या धुळीचा थर जमा होतो. शहरालगत जर हा कोल हॅन्डलिंक डेपो झाला, तर शहर उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार, असे आमदार मेश्राम यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
Amit Deshmukh, Abhijit Wanjari, Sanjay Meshram : महाराष्ट्रातील काँग्रेस आता तरुणांच्या हातात!
महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे. नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील गांगापूर येथे कोळसा साठवणूक आणि कोळशाच्या रेल्वे वाहतुकीचे काम प्रस्तावित आहे. ग्रामपंचायतीची परवानगी अभिप्रेत आहे की नाही, हे माहिती नाही. पण कोळसा अनलोड, अपलोड होत असताना केंद्रीय प्रदूषण बोर्डाने जे निकष घालून दिले आहे. ते पूर्ण करूनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तरादाखल सांगितले. पण प्रकल्प थांबवण्याबाबत कुठलेही स्पष्ट उत्तर मंत्र्यांनी दिले नाही.