Breaking

Yavatmal Police : फितुरांमुळे भूमाफिया सुरक्षित, तपास पथकाला गुंगारा!

Land mafia is safe because of the police : एमडी ड्रग्ज आणि शेतीचे बनावट खरेदी प्रकरण

Yavatmal एमडी ड्रग्ज आणि शेतीच्या बनावट खरेदी प्रकरणातील मास्टरमाईंड पोलिसांना दीड महिन्यापासून गुंगारा देत आहे. पोलिसांमधील फितुरामुळे हा भूमाफिया सुरक्षित आहे. त्याने यवतमाळात अनेक येरझारा या कालावधीत केल्या असून आता अटकपूर्व जामिनाची तयारी केली जात आहे.

मूळ शेतमालकाला अडकविण्यासाठी एमडी ड्रग्ज व देशी कट्टा ठेवून पोलिसांना टीप देण्यात आली. दुसरीकडे त्याने तोतया शेतमालक उभा करून ६३ लाख रुपये किमतीच्या (रेकॉर्डवरील) शेताची परस्पर खरेदी करून घेतली. यातही साक्षीदार पैसे देऊनच उभे केले. जवळच्या मित्राच्या नावे खरेदी केलेले शेत विकण्याचा घाट घातला. अशा व्यवहारात अडथळा नको म्हणून मूळ शेतमालकाला अडकविण्याचा कट रचला.

Excise department : 1 हजार 632 लिटर विदेशी दारूसाठा जप्त !

यासाठी त्याने पोलिसांशी असलेली सलगी कामात आणली. आता हा भूमाफिया याच आधारावर पोलिस खात्यातील फितुरांना हाताशी धरून अटकेपासून संरक्षण मिळवत आहे. तपास पथके त्याच्या मागावर आहे. फक्त माहिती मिळत असल्याने तो कचाट्यात सापडत नाही.

एमडी ड्रग्ज व बनावट शेत खरेदी प्रकरणात दोन गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास दोन पथकांकडून केला जात आहे. एलसीबीचे पथक एमडी ड्रग्ज प्रकरणात मास्टर माइंडच्या शोधात आहेत. तर बनावट खरेदीच्या गुन्ह्यात एसडीपीओ यवतमाळ यांचे पथक पाच आरोपींच्या मागावर आहेत. त्यापैकी केवळ दोन साक्षीदारांना अटक करण्यात आली आहे.

या भूमाफियाचा शासकीय नोकरीत असूनही शहराच्या मध्यवस्तीत सोशल क्लबच्या नावे जुगार अड्डा आहे. या जुगार अड्ड्यावर अनेक पोलिसांची नेहमीच ‘उठबस’ राहिली आहे. शिवाय वेगवेगळ्या प्रकरणातून पैसा कसा उभा करायचा हा हातखंड असणाऱ्या भूमाफियाच्या विरोधातील हालचालीची माहिती देणारे खात्यातच महाभाग आहे.

Yavatmal Police : जहाल नक्षलवादी दिलीप महतो याला अटक!

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार ठराविक अंतराने तीन वेळा यवतमाळात येवून गेला. तरीही त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली नाही. तो सुरक्षित परत गेला. शेत खरेदी करणारा सचिन राऊत, तोतया शेतमालक आणि या सर्व घटनाक्रमाचा मास्टर माइंड अजूनही या पथकाला मिळालेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येते.

वाकी, पारवा येथील शेतीचा मालक म्हणून अनुप जयस्वाल यांच्या नावाने तोतयाला उभे केले. सहायक दुय्यम निबंधक कार्यालय क्र. २ येथे खरेदीचा व्यवहार करण्यात आला. हा तोतया व्यक्ती कोण याची ओळख पटलेली नाही.