Breaking

Ajit Pawar : देशातील ७० टक्के पनीर कृत्रीम, अजित दादा म्हणाले..

 

70 percent of the country’s cheese is artificial, Ajit Dada said : विक्रम पाचपुतेंनी सभागृहात आणले पनीर, म्हणाले, भेसळ करणाऱ्यांवर ‘अटेम्प्ट टू मर्डर’ दाखल करा,

महाराष्ट्रासह देशभरात जे पनीर विकले जात आहे, ते कृत्रीम आहे. धक्कादायक म्हणजे कायद्याची पायमल्ली करून ते विकले जात आहे. आणि या खात्याचे मंत्री म्हणतात की, पनीर कृत्रीम असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास अद्याप आली नाही. ही बाब धक्कादायक असल्याचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते म्हणाले.

कृत्रीम पनीरच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेताना आमदार पाचपुते म्हणाले, आपण दैनंदिन आयुष्यात जे पनीर खातो त्यातील ७० टक्के पनीर कृत्रीम आहे. यावर संबंधित मंत्र्याचे उत्तर धक्का देणार आहे. कृत्रीम पनीर विकले जाते, ही बाब सरकारच्या निदर्शनास अद्याप आली नाही, असे त्यांनी उत्तरात म्हणले आहे. नियमित नमूने तपासले जातात, असेही त्यांनी म्हटले आहे. पण त्यांच्या तपासणीत ही बाब अद्याप आली नाही, हेच खरे आश्चर्यजनक आहे.

Ajit Pawar on Mungantiwar’s question : भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुतासारखे सरळ करणार!

यासंदर्भात २६१ नमुने विश्लेषणासाठी घेतले होते. त्यांपैकी ११५ नमुन्यांचा अहवाल आला. १९ नमुने कृत्रीम पनीरचे आढळले, अशी माहिती आमदार पाचपुतेंच्या प्रश्नावर देण्यात आली. त्यावर लॅब्स किती आहेत? फुड टेस्टींगसाठी स्पेसीफीक लॅब आहे का, असे प्रश्न करून पनीरच्या नावाखाली आपण तेलाचे गोळे मुलांना खाऊ घालत आहोत, असे आमदार पाचपुते म्हणाले.

माझा तारांकित प्रश्न क्रमांक २३३८ १० तारखेला लागला होता. त्यानंतर लगेच दोन ठिकाणी धाडी पडल्या. त्यामध्ये ६ लाख २५ हजाराचं पनीर जप्त झाल्याची माहिती देण्यात आली. पण १५ लाखांहून अधिक किमतीचे कृत्रीम पनीर पुणे आणि चंद्रपुरात सापडले. शोकांतिका म्हणजे ही माहिती बाहेर आली नाही. बजेटमध्ये या विभागासाठी ५७ कोटीची तरतूद केली आहे. ती पुरेशी आहे का, हेदेखील तपासण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प

सरकार विभागामार्फत मोबाईल लॅब्स आणणार होते, त्याचे पुढे काय झाले? एखादा उत्पादक भेसळ करताना सापडला तर त्याच्यावर मिसब्रॅंडींगची कारवाई होते. त्यातून तो सहज सुटून जातो. सोलापुरात पाच वेळा भेसळ करणाऱ्याला पकडले आणि आश्चर्य म्हणजे पाचव्यांदाही तो सहीसलामत सुटला. अशा भेसळ करणाऱ्यांवर ‘अटेम्प्ट टू मर्डर’ दाखल केला पाहिजे. कारण हे लोक लोकांच्या जिवाशी खेळ करत आहेत. परराज्यातून उत्पादने येतात, त्यावर कारवाई करण्याची काय यंत्रणा आहे, असा प्रश्न करत आपल्या राज्याच्या सिमांवर कारवाई करण्यासाठी बोटांवर मोजण्याइतकेच अधिकारी आहेत. कॅन्सरसारखे दुर्धर आजार फेक पनीरमुळे होतात. त्यामुळे ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी, असेही आमदार पाचपुते म्हणाले.

Ajit Pawar NCP : गडचिरोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. उत्तरादाखल ते म्हणाले, लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. यासंदर्भात लवकरच बैठक लावतो. आमदार पाचपुतेंनाही बोलावतो. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दुष्टीने ज्या काही गोष्टी लागतात, जेवढा निधी लागेल, तोही उपलब्ध करून देतो. आमचा विभाग, पोलिस विभाग, सर्व विभागांना विश्वासात घेऊन पेक पनीरच्या बाबतीत तातडीने कारवाई केली जाईल.

Ajit Pawar : स्वारगेट बस स्थानकातील घटना शरमेने मान खाली घालायला लावणारी!

नियम आणखी कडक करण्याची गरज असेल तर तेही करू. केंद्राच्या नियमांनाही अडचण येणार नाही, असा मार्ग काढू. वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांनाही भेटू. जे राज्य सरकारच्या हातात आहे, ते राज्य सरकार करेल आणि जे केंद्राच्या हातात आहे, ते केंद्र सरकार करेल. अधिवेशन संपायच्या आत आमदार पाचपुते, संबंधित मंत्री राज्यमंत्री यांची बैठक आयोजित करण्यात येईल. दोन्ही बाजुंच्या सदस्यांपैकी ज्यांचा कुणाचा या विषयावर अभ्यास असेल तर त्यांनीही बैठकीला यावे, असे अजित पवार म्हणाले.