Breaking

Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेसला केवळ आंदोलनासाठी निळा ध्वज लागतो!

Congress needs a blue flag only for protests : वंचित बहुजन आघाडीचा आरोप; भारतीय बौद्ध महासभेकडून धरणे आंदोलन

Akola काँग्रेसला केवळ आंदोलनासाठी संविधान आणि निळा ध्वज लागतो, अशी टीका वंचितच्या युवा आघाडीचे नेते राजेंद्र पातोडे यांनी टीका केली.महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले-शाहू-आंबेडकर विद्वत सभा, महिला कार्यकारिणी आणि इतर समविचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाविहार मुक्त न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय विहार म्हणूनच ताब्यात घेण्यात येईल, असा इशारा वंचितकडून देण्यात आला.

१२ मार्च रोजी ४१.३ अंश सेल्सियस तापमान असतानाही मोठ्या संख्येने बौद्ध बांधव आणि भगिनींनी रस्त्यावर उतरून महाविहार मुक्तीसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. बिहारमधील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र स्थळ असून, त्याच्या मुक्तीसाठी हे आंदोलन सुरू आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांची अपात्रता १८ मार्चपर्यंत लांबणीवर!

बिहार सरकारने १९४९ मध्ये लागू केलेल्या महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायद्यानुसार, महाविहाराच्या देखरेखीचे आणि व्यवस्थापनाचे काम केले जाते. मात्र, जसे इतर धर्मियांचे धार्मिक स्थळ त्यांच्या समाजाच्या ताब्यात असते, तसेच महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध धर्मियांकडे सुपूर्द करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

तसेच, या ठिकाणी ब्राह्मण पुजार्‍यांकडून अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना खतपाणी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे १९४९चा महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा त्वरित रद्द करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

Mahayuti Government : हे काय? ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’!

या आंदोलनात जिल्ह्यातील विविध तालुके, नगर, वार्ड शाखांचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, श्रामणेर, तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.