Breaking

Buldhana Congress : काँग्रेसच्या नेत्यांना शिंदेंशिवाय करमेना!

 

Congress leaders’ meetings with Eknath Shinde : भेटीगाठी वाढल्या, आता प्रदेश उपाध्यक्षही शिंदेसेनेच्या वाटेवर?

Buldhana विधानसभा निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यानंतर काँग्रेस पुरती गोंधळलेली आहे. अशात प्रदेशाध्यक्ष बुलढाण्याचा देऊन पक्षसंघटन बळकट होईल असा विचार झाला. मात्र, बुलढाण्यातच काँग्रेसला खिंडार पडण्याची चिन्हं आहेत. एकामागोमाग एक नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचत आहेत. तरीही आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा दावाही करत आहेत, हे विशेष.

जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांचे शिवसेना शिंदे गटात वळण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आमदार संजय गायकवाड यांनी पक्षविस्तारासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसमधील अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या दिशेने वळत असल्याचे दिसत आहे. अलीकडेच काँग्रेस नेते विजय अंभोरे आणि अॅड. गणेश सिंग राजपूत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

त्यानंतर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली होती. आता ही चर्चा थांबत नाही, तोच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राठोडदेखील शिवसेनेत प्रवेश करणार का, याबाबत चर्चा रंगली आहे.

Nitin Gadkari : खासदारांची मागणी, गडकरींनी दिला शब्द

 

संजय राठोड यांच्या पक्षांतराच्या चर्चेमागे विविध कारणे असू शकतात. यात विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर नाराजी जास्त चर्चेत आहे. आमदार संजय गायकवाड यांची सक्रिय शिष्टाई, किंवा व्यक्तिगत राजकीय महत्त्वाकांक्षा यापैकी नेमके कोणते कारण प्रभावी ठरले हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, संजय राठोड लवकरच शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Sanjay Meshram : ..तर उमरेड शहर उद्धवस्त होणार !

राठोड यांनी पक्षप्रवेशापूर्वी काही अटी ठेवल्या आहेत. विधान परिषद किंवा महामंडळाची जबाबदारी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. यवतमाळचे माजी मंत्री संजय राठोड यांनीही बुलढाण्याचे संजय राठोड यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. राठोड आणि शिंदे यांच्यात झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे लवकरच स्पष्ट होईल.

मात्र, काँग्रेसमधील नेत्यांचे एकामागून एक पक्षांतर होत असल्याने पक्षश्रेष्ठी आणि खासकरून मुकुल वासनिक यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काँग्रेसला या घडामोडींना रोखण्यात यश मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.