Breaking

Wardha Police : १९ सीसीटीव्ही, हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन!

 

19 CCTV cameras installed at Wardha bus stand : वर्धा बसस्थानकावर उपद्रवी गुन्हेगारांवर करडी नजर

Wardha बसस्थानकावरील प्रवाशांसह एसटीच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षा रक्षक व १९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवली जात आहे. बसस्थानक परिसरात पोलिस चौकीच्या माध्यमातून सुरक्षा केली जाते. तसेच हाकेच्या अंतरावर शहर पोलिस स्टेशन आहे. तसेच अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. स्वारगेट येथील अत्याचाराच्या घटनेनंतर वर्धा बसस्थानकाचा आढावा घेण्यात आला.

वर्धा बसस्थानकात रात्रीच्या वेळी १० ते १२ बस मुक्कामी असतात. त्यामध्ये शिवशाही व साध्या बसचा समावेश आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवशांची संख्या अधिक आहे. वर्धा बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी दोन सुरक्षा गार्ड सुरक्षा करताना दिसून येतात. सोबतच पोलिस पॅट्रोलिंगसुद्धा करण्यात येते.

वर्धा बसस्थानकावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे; परंतु बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी केवळ दोनच सुरक्षा गार्डवर बसस्थानकाची सुरक्षा आहे.

Mahayuti Government : हे काय? ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’!

वर्धा बसस्थानकात दररोज सरासरी १० ते १२ बस मुक्कामी असता. यामध्ये शिवशाही व साध्या बसचा समावेश आहे. यावर नजर ठेवण्यासाठी सुरक्षा गार्ड व सीसीटीव्ही बसस्थानक परिसरात लावले आहेत. वर्धा येथील बसस्थानकात पोलिस चौकी आहे. त्यांच्या मार्फत बसस्थानकाची सुरक्षा केली जाते. शिवाय हाकेच्या अंतरावर शहर पोलिस स्टेशनसुद्धा आहे.

Ajit Pawar : देशातील ७० टक्के पनीर कृत्रीम, अजित दादा म्हणाले..

वर्धा बसस्थानकावर १९ कॅमेऱ्यांतून नजर ठेवली जाते, तसेच ज्या शाळा परिसरात भंगार बस ठेवल्या जातात, त्या ठिकाणी बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंदी आहे. आर्वी आगारात ५, हिंगणघाट आगारात ८, जाम बसस्टँडमध्ये ४, पुलगाव ४, तळेगाव ६ आणि कारंजा मध्ये ४ कॅमेरे बसविण्यात आले आहे.

सर्व आगार, बसस्थानकावर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सुरक्षा वाढविण्याबाबत सर्व आगार प्रमुखांना आणि बसस्थानक व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहे.