Ramdas Athavle : आठवलेंच्या सभेने आरपीआय फुंकणार रणशिंग!

RPI’s preparations for local body elections : ८ एप्रिलला मलकापूरमध्ये जाहीर सभा; पदाधिकारी लागले कामाला

Buldhana रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काहीच करता आले नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले एनडीए NDA मध्ये आहेत, एवढेच काय ते श्रेय. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठी संधी आहे. आता महायुतीने जागावाटपात स्थान दिले नाही, तर आरपीआय स्वतंत्र देखील लढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांची एप्रिलमध्ये मलकापूर येथे होऊ घातलेली जाहीर सभा अधिक महत्त्वपूर्ण ठरते.

आठवले यांच्या ८ एप्रिलला मलकापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीसाठी अलीकडेच बैठक पार पडली. या जाहीर सभेतून आरपीआय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करीत आहे, हे स्पष्ट आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ही जाहीर सभा होणार आहे.

MLA Manoj Kayande : तीन दशकांपासून एकाच विषयावर चर्चा, तरीही निर्णय नाही

मलकापूर हे बुलडाणा जिल्ह्याचे प्रवेशद्वार असल्याने येथे लायब्ररी मैदानावर ८ एप्रिल २०२५ रोजी ही सभा पार पडणार आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक यांची बैठक बोलावण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव होते. बैठकीत जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार मांडून ८ एप्रिलच्या सभेचे नियोजन कसे भव्यदिव्य होईल यावर चर्चा केली.

Nana Patole : परिणय फुके आमच्या सभागृहाचे सदस्य नाहीत !

या बैठकीत दक्षिण जिल्हाध्यक्ष इंजिनिअर शरद खरात, उत्तर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. मुक्तार पठाण, महिला जिल्हाध्यक्ष वंदना वाघ, महासचिव निळकंठ सोनोने, युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील म्हस्के, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा बेग, आशाताई वानखडे, रोहिणी कबीरदास, भगवानराव इंगळे, दत्ता पाटील राहणे, इंजिनिअर राजेश सरकटे, संतोष झनके, सुनिल इंगळे, विलास गव्हांडे, जयपाल मोरे, डॉ. बबन परमेश्वर, ग. ग. इंगळे, डॉ. सुखदेव कांबळे, बाबूराव निकम आदी मान्यवर उपस्थित होते.