Chief Minister meets Prime Minister Narendra Modi in Delhi : मुख्यमंत्री म्हणतात सकारात्मक चर्चा झाली, नेमके काय घडले?
New Delhi मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सकारात्मक चर्चा झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण राज्यातील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर, या भेटीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde यांच्या गटात चांगलीच अस्वस्थता आहे. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस आणि शिंदे यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहे. त्यामुळे या भेटीची राजकीय चर्चा होत आहे.
जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद परिषदेचे दिल्लीत आयोजन करण्यात आले. या परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. त्यानिमित्ताने ते दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी देखील पोहोचले. तेथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय चर्चा होऊ लागल्या. पण या भेटीत विकासकामांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
CM Devendra Fadnavis : Creative तरुणांसाठी खुशखबर! IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT
राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला आहे. गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती पंतप्रधानांना केल्याचे फडणविसांनी सांगितले.
नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली आहे. त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : या प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता ११ महिने!
वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे. याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानल्याचे सांगण्यात आले.








