1500 water sources in the district will be revived : बावनकुळेंचे निर्देश; दीड हजार जलस्त्रोत होणार पुनर्जीवित
Nagpur पाणी टंचाईच्या दृष्टीने जो आराखडा मंजूर केला आहे तो कालमर्यादेत पूर्ण झालाच पाहिजे. पाणी टंचाईच्या नावाने ओरड व्हायला नको. सर्व यंत्रणांनी वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले
नियोजन भवन येथे जिल्ह्यातील विविध विभागांच्या विकास कामांची आढावा बैठक झाली. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुक्यात व इतर ठिकाणी दरवर्षी काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. इतर तालुक्यात जी लहान मोठी नदी, नाले, ओहोळ आहेत ती पावसाने काठोकाठ वाहिल्यामुळे पुराचा प्रश्न उद्भवून मोठ्या प्रमाणात जमीनीची धूप होते.
पाणी टंचाई आणि अतिवृष्ठीमुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ नये. यादृष्टीने जलसंधारणाची कामे करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील किमान दीड हजार जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले.
Devendra Fadnavis : मोदींच्या भेटीसाठी फडणवीस दिल्लीत, शिंदे गट अस्वस्थ
नागपूर जिल्ह्यात जवळपास 4 हजार 500 च्या आसपास लहान मोठे बंधारे, जलस्त्रोत आहेत. यातील अनेक लहान जलस्त्रोत पावसाच्या गाळाने भरले असून लहान नदी नाल्यातील हा गाळ काढणे आवश्यक आहे. शासनाने उभारलेल्या या जलसंसाधनांद्वारे मोठ्या प्रमाणात जलसंचय उपलब्ध होऊ शकतो. यादृष्टीने संबंधित विभाग प्रमुखांनी या कामावर लक्ष देऊन काम करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या.
जलसंधारणाच्या कामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. विंधन विहिर दुरस्ती, विहिर खोलीकरण व जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी खनिज प्रतिष्ठान मधील निधी उपलब्ध होईल. शासन निर्णयान्वये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 31 रुपये प्रतिघन मीटर एवढा दर गाळ काढण्यासाठी निश्चित केला आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळू शकेल याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
CM Devendra Fadnavis : Creative तरुणांसाठी खुशखबर! IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT
यांची उपस्थिती
या बैठकीला राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास ठाकरे, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार संजय मेश्राम यांची उपस्थिती होती.