Irregularities in Zilla Parishad water supply schemes in Buldhana : बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रकारावर मंत्र्यांची नाराजी
Buldhana जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे उघड झाले आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या सलग चार बैठकांनंतरही सुधारणा न झाल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या निलंबनासह अन्य कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण १,३५७ पाणीपुरवठा आणि नळ पाणीपुरवठा योजना आहेत. मात्र, त्यापैकी केवळ २९६ योजना पूर्ण झाल्या आहेत, तर ११८ योजना बंद अवस्थेत आहेत. उर्वरित योजनांचे काम अद्याप अपूर्ण आहे. ७५ ते ९९ टक्के पूर्णत्वास आलेल्या ४६७ योजनांना पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जलजीवन अभियानांतर्गत केवळ ९० योजनांच्या नळ जोडण्या पूर्ण झाल्या असून, फंक्शनल टॅप कनेक्शनमध्येही मोठ्या अनियमितता आढळल्या आहेत. विशेषतः ३० लाखांच्या आत खर्च असलेल्या योजनांची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाणीपुरवठा योजनांच्या निकृष्ट अंमलबजावणीसाठी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. काही योजनांची त्रयस्थ संस्थेद्वारे तपासणी करण्यात आली असली तरी इतर योजनांची का झाली नाही. याबाबत राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने स्पष्टीकरण मागितले आहे.
Sharad Pawar : AI तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होणार
खामगाव, लोणार आणि मेहकर तालुक्यांतील योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्या आहेत. त्रयस्थ संस्थेच्या अहवालातील गंभीर निरीक्षणांवर अद्याप योग्य ती कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांच्याकडून तातडीने खुलासा मागवण्यात आला आहे.