Police action will be taken if complaints against contractors and engineers : ग्रामपंचायतसोबत समन्वय ठेवण्याचे विभागप्रमुखांना निर्देश
Nagpur शेताला जाणारे पांदण रस्ते शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी आपण राज्यभर मोहीम हाती घेतली आहे. याची अंमलबजावणी प्रत्येक गावपातळीवरील कंत्राटदार व अभियंत्याने जबाबदारीने पार पाडली पाहिजे. यात कुणाच्या तक्रारी येता कामा नये. ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाई केली जाईल, या शब्दांत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठणकावले.
मौदा येथे आयोजित सरपंचांच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना या शेवटच्या घटकातील व्यक्तीचा विकास व्हावा यादृष्टीने आखण्यात आल्या आहेत. यात राज्य शासनासह केंद्र शासनाच्याही योजना आहेत. शेतीपासून पशुसंवर्धनापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत असणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पण ग्रामपंचायत आणि सरपंचांसोबत समन्वय ठेवणार नाही, तोपर्यंत ते शक्य नाही. त्यामुळे तालुका पातळीवरील विभागप्रमुखांनी हा समन्वय साधलाच पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
Chandrashekhar Bawankule : पाणी टंचाईची ओरड नको, ठरलेल्या वेळेत कामे करा!
महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, कौशल्य विकसित व्हावे यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. याची अंमलबजावणी ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक शाळेत झाली पाहिजे. त्यादृष्टीने जोपर्यंत पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिक शाळांशी समन्वय ठेवणार नाहीत, तोपर्यंत वस्तुस्थिती लक्षात येणार नाही, असंही ते म्हणाले. प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागप्रमुखांची आहे हे विसरता कामा नये, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
Chandrashekhar Bawankule : अमरावती विमानतळाला विमान वाहतुकीचा परवाना !
आरोग्य विभागाबाबत तक्रारी
आरोग्य विभागाबाबत अनेक तक्रारी आहेत. संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्याने तालुक्यातील प्राथमिक व उपप्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली पाहिजे. प्रत्येक सरपंचाशी समन्वय ठेवून साथीचे आजार, कुष्ठरोग, हत्तीरोग अशा आजारांच्या उच्चाटनासाठी कटिबद्ध असले पाहिजे. जोपर्यंत अधिकारीवर्ग गावपातळीवर जाऊन याचा आढावा घेणार नाही तोपर्यंत लोकांना मिळणा-या सुविधेत बदल होणार नाहीत, असे पालकमंत्री म्हणाले.