Breaking

Vijay Wadettiwar : नाना पटोलेंनी ऑफर देण्याची घाई केली!

Congress leader Vijay Wadettiwar said Nana Patole was in a hurry to make the offer : आताची धुसफूस पाहता काय होईल, हे सांगता येत नाही

Nagpur : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, नाना पटोले यांनी ऑफर देण्याची घाई केली, असे ते म्हणाले.

यासंदर्भात नागपुरात पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, त्यांनी काय ऑफर दिली ते मी माध्यमातून पहिले. राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. वेळेनुसार राजकारण चालत असतं. आताची धुसफूस पाहता काय होईल, हे सांगता येत नाही. पण नाना पटोले यांनी ऑफर देण्याची घाई केली, येवढंच मी यावेळी म्हणेन.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी ठणकावले, तक्रार आली तर पोलीस कारवाई करेन

माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, एखाद्याने खून केला तर कोर्ट उद्या असेच म्हणेल का, जे या प्रकरणात म्हटले गेले आहे. न्यायालयाची भूमिका नेमकी काय असणार आहे, असा आमचा प्रश्न आहे. गुन्हेगार असेल आणि त्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. एखादा लोकप्रतिनिधीने खून केला आणि त्यामुळे निवडणुकीचा खर्च वाढणार असेल तर अशाच पद्धतीची न्यायालयाची भूमिका असेल, तर हे हास्यास्पद आहे. न्यायालयाची भूमिका अशी असेल तर न्याय मिळणे दुरापास्त होईल, असे ते म्हणाले.

एक युवा शेतकरी पुरस्कार घेतो आणि दुसरीकडे आत्महत्या करतो. शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन काय फायदा आहे? शेतकरी आणि शेतकऱ्यासंदर्भात सरकारला किती कळवळा आहे, हे यातून दिसून आले. महाराष्ट्राच्या इतिहासात सत्ताधाऱ्यांच्या नावाने लिहीली जाणारी ही काळी नोंद असेल. यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे कुठेही निघालेले दिसणार नाहीत.

MLA Shweta Mahale : अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांना जामीनच मिळू नये

सक्तीच्या रजेवर पाठवल्या गेलेल्या पोलीस निरीक्षकासोबत न्यायाधीश धुळवड साजरी करत होते. यांचे संबंध काय आहे, हे तपासले गेले पाहिजे. हे प्रकरण बीडच्या बाहेरच्या न्यायालयात चालवले गेले पाहिजे. हा धिंगाणा लज्जास्पद आणि कायदा सुव्यवस्थेला लाज आणणारा आहे. सक्तीच्या रजेवर पाठवलेला पोलीस निरीक्षक हा न्यायाधीशासोबत होळी खेळताना काल बीडमध्ये पाहिले गेले. याचा अर्थ असा आहे की कायदा सुव्यवस्था राखणारे व पालन करणारे यांची जोडी घट्ट जमायला लागली आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.