By-elections for 25 seats of 15 Gram Panchayats in Chikhali Taluka : १५ ग्रामपंचायतींच्या २५ जागांसाठी पाेटनिवडणूक
Buldhana चिखली तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमधील २५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मुदत संपलेल्या, नवनिर्मित आणि चुकीच्या प्रभाग रचनेमुळे निवडणूक न झालेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
मालगणी, किन्ही नाईक, वैरागड, गोदरी, भरोसा, बोरगाव वसु, रोहडा, अमोना, कोलारा, देऊळगाव धनगर, भानखेड, भोकर, मोहदरी, डोंगरगाव आणि उदयनगर या १५ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.
तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी संतोष काकडे यांनी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मतदार यादी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेली मतदार यादी यासाठी आधार म्हणून घेतली जाणार आहे.
१९ मार्चला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. १९ ते २४ मार्च या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत असेल. तर २६ मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. तहसील प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदारांनी वेळेत आवश्यक दुरुस्ती व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा आपल्या मतदारसंघासाठी मोठा निर्णय
इतरांसाठी मात्र प्रतीक्षाच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ऑक्टोबरपूर्वी होणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. चिखलीमधील पोटनिवडणुकांमुळे काहींना दिलासा मिळाला असला. तरीही इतरांच्या वाट्याला मात्र प्रतीक्षाच आली आहे. न्यायालयाची सुनावणी पुढे गेली. उन्हाळा व पावसाळ्यात निवडणुका होणे शक्य नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी निवडणुका होतील, असे बोलले जात आहे.