Breaking

Sandip Joshi’s name for Legislative Council : संदीप जोशी म्हणत असतील ‘तेरे जैसा यार कहाँ’!

 

Devendra Fadnavis nominated friend’s name for upper house : विधानपरिषदेवर वर्णी; फडणविसांनी जपली ‘यारी’

Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांची ‘दोस्ती’ अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. नागपूरकर तर हा याराना अनके वर्षांपासून अनुभवत आहेत. फडणविसांनी आता संदीप जोशी यांना थेट विधान परिषदेत संधी दिली आहे. त्यामुळे जोशींच्या तोंडून आपसुकच ‘तेरे जैसा यार कहाँ’ हे शब्द निघाले असतील तर त्याचे आश्चर्य वाटायला नको.

भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये संदीप जोशी यांचं नाव असणं मुळीच आश्चर्याचं मानलं जात नाहीये. या निर्णयामुळे फडणविसांनी अनेकांचा रोषही ओढवून घेतला असण्याची शक्यता आहे. पण ‘बने चाहे दुश्मन ज़माना हमारा… सलामत रहे दोस्ताना हमारा’ असा विचार करूनच फडणविसांनी पाऊल उचलेल असावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

CM Devendra Fadnavis : Creative तरुणांसाठी खुशखबर! IIT च्या धर्तीवर मुंबईत आता IICT

देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांचा विरोध पत्करून संदीप जोशी यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण त्यावेळी काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी जोशींना पराभूत केले होते. पाच दशकांपासून भाजपकडे असलेली ही जागा जोशींच्या पराभवामुळे हातून निसटली होती. त्यापूर्वी त्यांना महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षपद दिले. नागपूरचे महापौरपद दिले. पण आमदार होण्याची इच्छा अपूर्ण होती.

CM Devendra Fadnavis : आयआयएम नागपूरची Net Zero कडे वाटचाल!

दरम्यानच्या काळात भाजपची सत्ता गेली आणि महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यामुळे जोशी यांच्या वाट्याला प्रतीक्षा होती. पण महायुतीचे सरकार येताच त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. विधानसभा निवडणुकीत प्रवीण दटके यांना मध्य नागपुरातून संधी देण्यात आली. त्यावेळी जोशींचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जाऊ लागले. पण निवडणुकीत जागावाटपावरून झालेल्या तडजोडींमध्ये कुणाकुणाला शब्द दिलाय, हे फडणविसांनाच माहिती होते.

त्यामुळे अविनाश ठाकरे, दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता अशी अनेक नावे चर्चेत होती. पण अखेर संदीप जोशी यांनाच प्रवीण दटके यांच्या जागेवर परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.