Breaking

Water department : वरवंड-पिंपरखेड पाणीपुरवठा याेजनेत भ्रष्टाचार

 

Corruption in Varvand-Pimparkhed water supply project : चाैकशीच्या आश्वासनानेच उपाेषण सुटले

Buldhana जल जीवन मिशन अंतर्गत वरवंड-पिंपरखेड पाणीपुरवठा योजनेच्या तातडीने पूर्णतेसाठी आणि झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी दत्तात्रय जेऊघाले यांनी ६ मार्चपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या मागण्यांना गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. मात्र चौकशीचे आश्वासन दिल्यानंतरच त्यांनी उपोषण मागे घेतले.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत प्रशासनावर दबाव टाकला. यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १६ मार्चपासून युद्धपातळीवर काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे सहाव्या दिवशी जेऊघाले यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले. वरवंड येथे जल जीवन मिशन अंतर्गत ४.९९ कोटी रुपयांच्या निधीने पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.

Gulabrao Patil : पाणीपुरवठा योजनांमध्ये अनियमितता, निलंबन होणार

३१ जानेवारी २०२३ रोजी कंत्राटदार लक्ष्मण देशमुख (रा. खामगाव) यांना आदेश देण्यात आला होता. मात्र, ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असले तरी मार्च २०२५ उजाडला तरी काम केवळ ५०%च पूर्ण झाले आहे.योजनेच्या अंदाजपत्रकानुसार अनेक कामे अस्तित्वातच नाहीत.

जुन्या पाईपलाइनचा वापर, निकृष्ट दर्जाचे जलकुंभ बांधकाम आणि वितरण यंत्रणेचा अभाव अशी अनेक त्रुटी आढळल्या. तरीही संबंधित कंत्राटदाराने संपूर्ण देयके मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावकरी वंचित राहिले आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : या प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता ११ महिने!

जेऊघाले यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाला झुकावे लागले. रविकांत तुपकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली. यानंतर पाणीपुरवठा विभागाने १६ मार्चपासून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. यामुळे बंद पडलेले काम पुन्हा सुरू होणार असून उर्वरित काम तातडीने पूर्ण होणार आहे. मात्र, जर प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही, तर मुख्य अभियंता कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दत्तात्रय जेऊघाले यांनी दिला आहे.