Breaking

Sanjay Gandhi Niradhar Yojana : निराधारांना मिळालाच नाही आधार!

 

No honorarium has been received for the scheme since December 2024 : डिसेंबर २०२४ पासून लाभार्थ्यांना मानधन मिळालेच नाही

Wardha निराधारांना स्वाभिमानाचे जगता यावे. त्यांना उतरत्या काळात एक आधार मिळावा. या उद्देशानाने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून दरमहा १ हजार ५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. शासनाने डिसेंबर २०२४ पासून सर्व निराधार लाभार्थ्यांचे अनुदान डीबीटीव्दारे थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. परंतु बहुतांश लाभार्थ्यांचे आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याने सध्या शासनाचे डीबीटी पेमेंट फेल ठरले आहे. परिणामी निराधारांना पंधराशे रुपयांचा आधारही मिळालेला नाही.

आठही तालुक्यामध्ये एकूण ८३ हजार ८९ निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती व श्रावणबाळा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती या लाभार्थ्यांचा समावेश आहे.

Mahayuti Government : शुभमंगल योजनेचा उडाला फज्जा!

जिल्ह्यात ३१ जानेवारी २०२५ पर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या ७६ हजार ४६७ लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलवर नोंदविण्यात आले. ६ हजार ६२२ लाभार्थ्यांची मात्र डीबीटी पोर्टलवर नोंदणी होऊ शकली नाही. इतर लाभार्थ्यांचा प्रशासन शोध घेत असून ज्यांचा शोध लागला नाही ते मयत किंवा गाव सोडून गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. डिसेंबर व जानेवारीचे अनुदान राज्य शासनाद्वारे थेट डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत

६१ हजार ८ लाभार्थ्यांच्या खात्यात यशस्वीपणे अनुदानाची रक्कम जमा झाली असली तरी ९ हजार ५१८ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होऊ शकली नाही. डीबीटी पोर्टलवर नोंद करून सुद्धा ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही, त्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल नंबर, पूर्ण नाव, जन्मतारखेसह अपडेट करून, बँक खात्याला सिडींग करून घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी प्रशासनाने व्यापक स्वरुपात जनजागृती करणे गरजेचे आहे.