Breaking

Lonar Panchayat samiti : तब्बल पाच वर्षांनी होतेय आमसभा!

Politics flared up in Panchayat Samiti due to invitation to former MLA : माजी आमदाराला निमंत्रण, लाेणार पंचायत समितीचे राजकारण तापले

Buldhana पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोणार पंचायत समितीची आमसभा अखेर २८ मार्च रोजी आयोजित केली जाणार आहे. मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात MLA Siddharth Kharat यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव prataprao Jadhav तसेच सिंदखेडराजा विधानसभेचे आमदार मनोज कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होईल. मात्र सध्या माजी आमदारालाही निमंत्रण दिल्यामुळे चांगलेच राजकारण पेटले आहे.

या सभेला माजी आमदार संजय रायमुलकर Sanjay Raimulkar यांनाही निमंत्रण दिल्याने वाद उपस्थित झाला आहे. आता माजी मंत्री तथा आमदार सुबाेध सावजी यांनाही आमंत्रित करण्याची मागणी समाेर आली आहे. लोणार तालुका मेहकर आणि सिंदखेडराजा मतदार संघात विभागला गेला असल्याने दोन्ही नव्या आमदारांच्या उपस्थितीत होणारी ही सभा विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

Ravikant Tupkar : आंदोलन करणाऱ्यांना झोपेतच अटक!

मागील पाच वर्षांपासून प्रशासकीय अडचणी, राजकीय अस्थिरता आणि स्थानिक तणाव यांमुळे ही सभा आयोजित होऊ शकली नव्हती. मात्र, नव्या नेतृत्वाखाली समितीची सभा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये अपेक्षांचे वातावरण आहे.

आमसभेत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या समस्या, सरकारी योजना आणि अनुदानांची अंमलबजावणी या विषयांवरही विचारविनिमय होणार आहे. दोन्ही आमदारांनी निवडणुकीत विकासाचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांना या बैठकीतून ठोस निर्णयांची अपेक्षा आहे.

Ex-MLA Sanjay Raimulkar : काँग्रेस नेत्याचा माजी आमदारावर गंभीर आरोप

यंदाच्या आमसभेला माजी आमदार संजय रायमूलकर यांना निमंत्रित करण्यात आल्याने माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या समर्थकांनीही त्यांना निमंत्रित करण्याची मागणी केली आहे. यामुळे पंचायत समिती प्रशासनाची कोंडी झाली असून, या निर्णयामुळे सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

पाच वर्षांनंतर होणारी ही सभा फक्त औपचारिकता न ठरता प्रत्यक्ष निर्णय घेणारी ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील अनेक विकासकामे रखडलेली असताना या सभेत ठोस निर्णय घेतले जाणे आवश्यक आहे.