Breaking

MLA Shweta Mahale : आता तरी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा!

 

Stop cheating farmers now : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आमदार आक्रमक, विधानसभेत चर्चा

Buldhana शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यास विलंब होत आहे. पीकविमा कंपन्या मुजोरी करत आहेत. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. आता तरी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, या शब्दांत आमदारांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली.

आमदार श्वेता महाले यांनी देखील विधानसभेत उपस्थित झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. ‘शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार की नाही?’ असा सवाल त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या सभागृहात मांडल्या.

पीक नुकसानाची तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत भरपाई मिळणे अपेक्षित आहे. मात्र, खरीप हंगाम संपून चार महिने लोटूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्यांनी मान्यता दिल्यानंतरही ४७१ पैकी १६० ठिकाणी पीकविमा कंपन्यांनी अपील दाखल केले आहे. त्यामुळे भरपाई वाटपाला उशीर होत असल्याचा आरोप महाले यांनी केला.

MLA Shweta Mahale : अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांना जामीनच मिळू नये

२०२३-२४ ची प्रलंबित पीकविमा नुकसान भरपाई कधी मिळणार?, २०२४-२५ची नुकसान भरपाई कधी मिळणार?, मा कंपन्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात शासन कारवाई करणार का?, लोकप्रतिनिधी, शासन आणि विमा कंपनी यांची संयुक्त बैठक आयोजित करणार का? असे प्रश्न आमदारांनी उपस्थित केले.

Shweta Mahale : आमदार श्वेता महाले यांना धमकी; चिखलीत रास्ता रोको

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मागील वर्षीची व या वर्षीची नुकसान भरपाई जमा केली जाईल, असा शब्द दिला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
आमदार महाले यांनी पीकविमा कंपन्यांच्या भ्रष्टाचाराची गंभीर दखल घेण्याची विनंती सरकारला केली. विमा कंपनीचे अधिकारी व कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय नुकसान भरपाईची प्रक्रिया पूर्ण करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.