Sudhir Mungantiwar : माजी अर्थमंत्री म्हणाले उत्पन्न वाढवा, विद्यमान अर्थमंत्र्यांनी मुनगंटीवारांना केले अध्यक्ष !

 

Ajit Pawar will appoint Sudhir Mungantiwar as the chairman of ‘that’ committee : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार समिती, केरळ लॉटरीचा अभ्यास करणार

Mumbai : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी फर्निचर क्लस्टरसाठी ७५ कोटी रुपये मागितले होते. त्यावर पैसै देण्यासंदर्भात असमर्थता दाखवली होती. त्यानंतर जर पैसे नाहीत, तर सरकारचे उत्पन्न वाढवा. पण विकास आणि रोजगार देणारे कामं का थांबवता, असा सवाल मुनगंटीवार यांनी काल (२० मार्च) अनुदानावरील चर्चेदरम्यान केला. केरळच्या धर्तीवर लॉटरीतून उत्पन्न वाढवण्याची सूचना त्यांनी केली. ही सुचना अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकपणे घेतली आणि त्या कमिटीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना करणार असल्याची घोषणा केली.

यासंदर्भात आमदार मुनगंटीवार म्हणाले, राज्याला आर्थिक अडचणी आहेत, हे समजू शकतो. आपण सर्वजण विश्वस्त आहोत. आपण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतो. पण काही शिकतो का, असा प्रश्न करत महाराजांच्या राज्यात गडकिल्ल्यांच्या दुरूस्तीसाठी जेव्हा पैशांची गरज होती, तेव्हा महाराजांनी उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत शोधून काढले. आपल्या राज्याचे उत्पन्न वाढू शकते, याचा विचार करण्याची कुणालाही आज फुरसत नाही. आपण राजकारण आणि इतर गोष्टींत व्यस्त असतो.

Sudhir Mungantiwar : झरपट नदीपाठोपाठ ईरई नदीसाठीही सरसावले आमदार मुनगंटीवार !

जीएसटीच्या ३५ बैठकांमध्ये मीही सदस्य होतो. १२ एप्रिल १९६९ ला महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू केली. साप्ताहीक, मासीक, गुढीपाढवा, गणपती यावेळी लॉटरी काढली जाते. आता या विभागाला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे सन २०२३-२४ चे एकुण उत्पन्न २४ कोटी ४३ लाख ६१ हजार आहे. बक्षीस, जीएसटी सर्व जाऊन ३ कोटी ५१ लाख ६६ हजार १६३ रुपये राहतात. आपले उत्पन्न कमी आहे. पण इतर राज्यांकडे जे चांगलं आहे, ते आपण घेतले पाहिजे, असे सांगत आमदार मुनगंटीवार यांनी केरळ राज्याचे उदाहरण दिले.

केरळने जी लॉटरी केली, त्यांचे २०२३-२४ चे उत्पन्न १२ हजार ५२९ कोटी आहे. तुलनेत आपण कुठे आहोत, याचा विचार करायला हवा. आपण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पगारावर मोठा खर्च करतो. सातवा वेतन आयोग देतो. केरळ पॅटर्न राबवल्याने राज्यातील उत्पन्न वाढत असेल तर हरकत काय आहे? यासाठी आमदारांची एक समिती करावी, ती केरळला पाठवावी. ही समिती केरळ लॉटरीचा अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल देईल, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : सर्व घटकांना सामावून घेणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प  

कुणीही करोडपती लॉटरी काढत नाही. तर गरीब आणि मध्यमवर्गीय लोक लॉटरी घेतात. त्यामुळे केरळ सरकारने एक निकष लावला की, लॉटरीतून मिळालेला पैसा गरीबांच्या उत्थानासाठी खर्च करावा आणि तो केला जातो. हे सर्व म्हणण्याचा अधिकार मला आहे. कारण अर्थमंत्री असताना स्वातंत्र्यानंतर देशात ११ हजार ९७५ कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट मी दिला. २ हजार ७२ कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिला. त्यामुळे ‘पैसे नाहीत’, हे एकून मनाला वेदना होतात, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले. जेवढं उत्पन्न आहे, त्यातूनच सर्व करतो म्हटलं तर होणार नाही. त्यामुळे राज्याचे उत्पन्न वाढवण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला सांगितले.

Sudhir Mungantiwar : केवळ भाषणांनी महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत !

आमदार मुनगंटीवार यांची राज्याला मदत होईल..
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, मी आत्ताच जाहिर करतो की, सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करणार. त्यामध्ये दोन्ही बाजुंकडील सदस्यांची नावं घेणार. २६ मार्चला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी समितीमध्ये सदस्य कोण-कोण असतील, ते जाहिर करणार. सुधीर मुनंगंटीवार यांनी म्हटल्याप्रमाणे राज्याचे उत्पन्न वाढण्याकरीता हातभार होत असेल तर चांगलेच आहे. शेवटी सुधीर मुनगंटीवार यांनीही ६ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. मला त्यांची मदतच होईल.