Breaking

Meghna Bordikar : त्या घटनेचा गव्हाशी ‘केसा’चाही संबंध नाही!

Hair loss are not caused by ration wheat : राज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, शेगाव तालुक्यातील केसगळतीचे प्रकरण विधानपरिषदेत

Buldhana शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक वाढलेल्या केसगळतीच्या घटनांबाबत चर्चा रंगली आहे. असे असतानाच, हे प्रकार रेशनच्या गव्हामुळे झालेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.

राज्यमंत्री बोर्डीकर साकोरे यांनी सांगितले की, केसगळतीच्या घटनांची गंभीर दखल घेत गावागावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. पाणी, माती, रक्ताचे नमुने आणि गहू यांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी आयसीएमआरकडे (ICMR) पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच केसगळतीची मूळ कारणे स्पष्ट होतील. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

या गावांमधील लहान मुले आणि गर्भवती महिलांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासण्या नियमितपणे करून त्यांना आवश्यक ते आरोग्यसेवा पुरविण्याचे काम सुरू आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा दर्जा तपासला जातो. शिवभोजन, मध्यान्न भोजन आणि रेशनच्या धान्यांचे वाटप अत्यंत काटेकोरपणे केले जात आहे.

Hair loss case : केसगळती प्रकरण : सेलेनियमयुक्त गहू वाटप सुरूच

भविष्यात या तपासण्या अधिक कडक करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आश्रमशाळा आणि शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्न भोजनाच्या स्वच्छतेबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. जर कुठे हलगर्जीपणा आढळला, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही बोर्डीकर साकोरे यांनी स्पष्ट केले.

Hair Loss disease : केस गळालेल्यांना धीर देण्यासाठी स्वतःच केले मुंडन!

शेगाव तालुक्यातील केसगळतीच्या घटनांचा संबंध रेशनच्या गव्हाशी नाही, असे शासनाचे स्पष्ट मत आहे. आयसीएमआरच्या अहवालानंतर या घटनांचे मूळ कारण समजेल आणि त्यानुसार पुढील योग्य ती पावले उचलली जातील. केसगळतीच्या घटनांचा सखोल अभ्यास करून संबंधित गावांमधील नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही बोर्डीकर साकोरे यांनी दिले आहे.