Breaking

DCM Eknath Shinde: जनतेनेच दाखवून दिली खरी शिवसेना !

Leaders of Uddhav Thackeray’s party now in Shinde’s Shiv Sena उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

THANE उध्दव गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची? असे वक्तव्य केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव गटाला डिवचले.

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 5 जानेवारी) शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

शिंदे म्हणाले ‘राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरीनी शिवसेनेची भक्कम साथ दिली. या निवडणुकीत आपल्या पक्षाचे 57 आणि 3 सहयोगी पक्षाचे असे 60 उमेदवार निवडून आले. जनतेने शिवसेनेची साथ दिली आहे. खरी शिवसेना कुणाची आहे हेदेखील दाखवून दिले.’

CM Devendra Fadnavis: आदिवासी विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागणार नाही !

शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांचे आता पक्षप्रवेश होत आहे. ही संख्या वाढत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nitin Gadkari : उपेंद्र शेंडे यांनी संकटातही तत्वांशी तडजोड केली नाही !

ठाकरेंना धक्का

नवी मुंबईतील उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेविका मेघाली राऊत, शिवसेना उबाठा गटाचे कोपरखैरणेचे विभागप्रमुख मधुकर राऊत आदींनी शिंदेसेनेत प्रवेश घेतला. नवी मुंबईतील या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उद्धव गटाला सोडचिठ्ठी दिल्याने त्याना हा मोठा धक्का मानला जातो आहे.