Breaking

Eknath Shinde Shivsena : कुणाल कामरावर फक्त गुन्हा नको, अटक करा!

 

Don’t just charge Kunal Kamra, arrest him : आक्षेपार्ह वक्तव्यावर अकोल्यात शिवसेनेचे आंदोलन

Akola महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण फक्त गुन्हा नोंदवून चालणार नाही, त्याला अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अकोल्यात या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने आज, सोमवार, दि. २४ मार्चला आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दुपारी २ वाजता मदनलाल धिंग्रा चौक, बस स्टँड जवळ अकोला येथे पार पडले.

शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन उद्धवराव नवले यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी कॉमेडियन कुणाल कामरा यांना तातडीने अटक करण्याची मागणी शासनाकडे केली. भविष्यात शिवसेनेच्या नेत्यांविषयी कोणीही अशा प्रकारची विधान केली, तर शिवसेना तीव्र भूमिका घेईल, असं ते म्हणाले.

Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत incoming मोठी रांग!

यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कुणाल कामरा यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अश्विन नवले, श्रीरंग पिंजरकर, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, चंद्रशेखर पांडे (गुरुजी) यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेने प्रशासनाला इशारा दिला की, जर लवकरात लवकर कुणाल कामरा यांच्यावर कारवाई झाली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Eknath Shinde Shivsena: पटेल, पटोलेंच्या गडात शिंदेसेनेची मोर्चेबांधणी !

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी 23 मार्च रोजी त्यांच्या X हँडलवर महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात एक व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओत त्यांनी ‘भोलीसी सुरत’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गीत गायले. या प्रकरणावर शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड केली तसेच शासनाकडे कामरा यांच्या अटकेची मागणी केली.