Kolhapur Police arrested Koratkar in Telangana : कोल्हापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एक महिन्यापासून होता फरार
Mumbai छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणामध्ये अटक केली आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना रात्री बारा वाजता फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रशांत कोरटकरवर आहे. त्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात त्याच्या घरावर छापा टाकला. पण त्यापूर्वीच तो फरार झाला होता.
दोनच दिवसांपूर्वी कोरटकर दुबईला फरार झाल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, त्याचा दुबईतील व्हिडिओ जुना असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर आज त्याला तेलंगणातून अटक करण्यात आल्याने दुबईची माहिती अफवाच ठरली. विशेष म्हणजे कोरटकरचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्याला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होतीच. गेल्या एक महिन्यापासून तो पोलिसांना चकमा देऊन शहरं बदलत फिरत होता.
Prashant Koratkar Vs. Indrajeet Sawant : प्रशांत कोरटकरविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!
कोरटकर याने नागपुरातून पलायन केल्यामुळे कोल्हापूर पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मात्र त्याच्या लोकेशनचा शोध घेणे सुरू होते. अखेर तेलंगणात लपून बसलेला कोरटकर, कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागला आहे. आता त्याला कोल्हापूरमध्ये नेऊन कसून चौकशी होणार आहे.
Prashant Koratkar : कोरटकर खोटं बोलला, धमकी देणारा आवाज त्याचाच!
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप प्रशांत कोरटकर याने केला. त्याने फोन करून सावंत यांना धमकी दिली. सावंत यांनी त्याचे कॉल रेकॉर्डिंग देखील सोशल मीडियावर शेअर केले. ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत कोरटकर यांनी सावंतांना शिवीगाळ केली होती.