Allegations of betting fraud in IPL cricket tournament with the help of Mumbai Police : आयपीएल बेटींगच्या संभाषणाचा पेनड्राइव्ह सभापतींकडे सादर
Mumbai : मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. त्या संभाषणाचा पेनड्राइव्हच सभापतींकडे त्यांनी सादर केला.
बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचाही गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस २४ नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएलसाठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली.
राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाढे काढले. तसेच राज्यातील आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या कार्यपध्दतीवर निषेध व्यक्त केला. ‘छोटे मनसे कोही बडा नही हो सकता, तुटे मनसे कोही खडा होई न सकता’,
या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काव्यपंक्ती सादर करून दानवे यांनी सरकारच्या कारभारावर टिका केली.
Ambadas Danve : कर्जाच्या ओझ्याखाली राज्य, तरीही विकासाचा डंका वाजवण्याचा अयशस्वी प्रयत्न!
राज्याने गेल्या दोन वर्षांपासून क्राईम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिध्द केला नाही. राज्यात 564 विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत. नागपूर, पुणे, संभाजीनगरमध्ये बलात्कराच्या घटनांचा आलेख वाढला आहे. दररोज 22 बलात्कार, 45 विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचे दानवे म्हणाले. सरकारने सुरु केलेले मिशन शक्ती अभियानात आतापर्यंत 22 टक्के रक्कम खर्च झाली आहे, ही दुर्देवी बाब असल्याचेही ते म्हणाले. कारागृहाची बंदीची क्षमता 27 हजार 114 बंदी असताना 43 हजार बंदी कोंबून ठेवले आहेत. राज्यात 51 हजार कोटी रुपयांची फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुन्हयांचे व सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढल असून ते रोखण्यासाठी सायबर सेल प्रभावी होण्याची आवश्यकता असल्याचे दानवेंनी सांगितले.
अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. बीड मस्साजोग सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही. सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. मंत्र्यांचा परदेशात चाललेल्या मुलाच विमान वळवलं जातं. परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही, अशा शब्दांत दानवे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली जात असेल तर सर्वसामान्य घरांतील मुलींची काय स्थिती असेल, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. जालनामधील भोकरदन येथे बोऱ्हाडे नावाच्या व्यक्तीला चटके दिले, त्या घटनेत नवनाथ दौंड या तालुकाप्रमुखांवर खोटा गुन्हा दाखल केला गेला.
Ambadas Danve : फक्त ८ करारांसाठी दावोसला जायची काय गरज होती ?
अहमदाबादमधील सुधीर कोठडिया नावाच्या व्यक्तीने 2 हजार कोटी रुपये डिजिटल पध्दतीने जमवून हवाला मार्फत ते विदेशात पाठवले. यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याबाबत पराग अशोककुमार शहा यांनी तक्रार केली. मात्र याबाबत पुणे की नारायण गावात गुन्हा दाखल व्हायला होता. मात्र ठाण्यात पोलीस उपायुक्तांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करतात. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली.








