Leader of the Opposition in the Legislative Council Ambadas Danve took a dig at the government : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काढले सरकारचे वाभाढे
Mumbai : औरंगजेबच्या कबरीच्या देखभालीसाठी साडेसहा लाख रुपये तर सिंधुदूर्गमधील शिवरायांच्या मंदिरांच्या देखभालीसाठी केवळ २५० रुपये येतात. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा उल्लेख विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात केला. इतर धर्मांचाही मान राखला पाहिजे, असे म्हणत त्यांनी हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारला खडेबोल सुनावले. याशिवाय राज्यात सुरू असलेल्या विविध घोटाळ्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
आज (२५ मार्च) अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना दानवे म्हणाले, सिडको योजनेतील खरपुडीची 247 हेक्टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांकडून सतीश अग्रवाल, कृष्णकुमार गोयल, राधेश्याम, चिप्पा रखमाजी आदींनी विकत घेतली. 18 जून 2008 ला हे प्रदूषित क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यानंतर आर्थिक साहाय्यता नसल्यामुळे हा प्रकल्प रद्द केला होता. यात सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी डीएसके लीगल सर्व्हिसेसची अवैध नेमणूक करून देयके दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. याप्रकरणी चौकशीची मागणीही त्यांनी केली.
Ambadas Danve : मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बेटींग
मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव विशाल राठोड यांनी स्वत:च्या सहीने गो बंजारा ट्रस्टची जागा मंत्र्याच्या नावे करून घेतली. उल्हास नगर महानगरपालिकेत युडीच उल्लंघन करून टीडीआर घोटाळा झाला आहे. यात ललित खोब्रागडे नावाच्या अधिकाऱ्याने युडीसिपीआर उल्लंघन केल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला. अंधेरी के पश्चिम विभागातील चक्रपाणी नावाचे उपायुक्तांच्या वरदहस्ताने अवैध बांधकाम सुरु आहे. बोरिवली येथील पालिकेचे भगवतीचे हॉस्पीटलचे खासगीकरण करण्याचं प्रयत्न महापालिका करत असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
शत्रू संपत्तीबाबत पाकिस्तानच्या बॉंडवर आपल्याकडे कारवाई झाली. याबाबत मीरा भाईंदरच्या राजू शहा यांनी तक्रार केली असता, त्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन येत असल्याची माहितीही दानवे यांनी सभागृहात दिली. परिवहन विभागाने वाहतूक स्पीडवर मीटर मर्यादा निर्बंधाचा उल्लेख केला पाहिजे. वाहतूक स्पीडवर वेग नियंत्रक असले पाहिजे. त्यावर परिवहन विभाग लक्ष देत नाही. बेस्ट, टीएमटी, एनएमटीच्या बस धावत असलेल्या मार्गावर सिटी फ्लोच्या बसेस धावतात, त्यामुळे सार्वजनिक वाहतूकीच्या बसेसवर बंधन येतात. त्यामुळे सीटी फ्लोच्या बसेस बंद करण्याची मागणी दानवे यांनी केली.
Ambadas Danve : राज्यपालांच्या अभिभाषणाचे अंबादास दानवेंनी केले पोस्टमार्टम !
आरोग्य विभागात बनावट औषधांचा पुरवठा झाला. तत्कालीन आरोग्य मंत्री यांनी यांत्रिक पध्दतीने स्वच्छता करण्याच्या निविदेसाठी ७७ कोटी रुपये खर्च येणार असताना ६६८ कोटी रुपये दाखवून गैरव्यवहार केल्याचा आरोप दानवे यांनी केला.
मुंबई ठाण्यातील हॉटेलमध्ये रुफ टॉपवर विदेशी दारू पुरविणे सुरु आहे. लीव्हीन लिक्वीड नावाची कंपनी त्यांच्या ऍपवर विदेशी दारू घरपोच उपलब्ध करून नियमाच उल्लंघन करतेय. त्यामुळे फोरेन लिकर बॉंडचे धोरण सरकारने स्पष्ट करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे.