Minister Sanjay Rathod : ४,४०० मालगुजरी तलाव होणार गाळमुक्त!

4,400 Malgujri lakes will be silted-free : भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी जलसंधारण मंत्र्यांचा निर्णय

Mumbai भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रूपांतरित खडकांमुळे जमिनीत पाणी झिरपण्याचा वेग मंदावतो. यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मालगुजरी तलावांवर अवलंबून असतात. मात्र, अनेक तलावांमध्ये गाळ साचल्याने त्यांच्या पाणी साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ४,४०० मालगुजरी तलाव गाळमुक्त करण्याची मागणी पुढे आली होती. त्यानंतर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पुढील दोन ते तीन वर्षांत हे तलाव गाळमुक्त करण्याचा शब्द दिला. त्यांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Mahayuti Government : तर नोकरी लावून देणाऱ्या एजन्सीधारकांना तुरुंगाची हवा!

या अभियानासाठी टाटा इंडस्ट्रीज Tata Industries आणि नाम फाउंडेशनसारख्या NAAM Foundation संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने तलावांचे खोलीकरण करण्यात येईल. जेणेकरून जलसाठा वाढेल आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना मोठा आधार मिळणार आहे. भविष्यात सिंचन व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात आयोजित बैठकीत जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, उपसचिव, अवर सचिव, मुख्य अभियंता आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जलसंधारणाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. गाळमुक्त तलाव योजनेसाठी तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Mahayuti Government : काय सांगता! नागपूर महापालिकेचा कारभार सर्वांत फास्ट?

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात शेकडो वर्षांपासून मालगुजरी तलाव अस्तित्वात आहे. पूर्व विदर्भातील पारंपरिक जलस्रोत म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. परंतु गेल्या काही दशकांमध्ये या तलावांकडे दुर्लक्ष झाल्याने गाळ साचून त्यांची जलसाठवण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. मात्र आता जलसंधारण मंत्र्यांनी यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे.