Various copies of the meeting minutes were sent to government offices : दोन वेगवेगळ्या प्रती शासकीय कार्यालयांना पाठवल्या
Akola ३१ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्ताच्या दोन वेगवेगळ्या प्रती वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यातही उल्लेखनीय फरक असल्याचा आरोप माजी समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे भाजप BJP व वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीने दलित वस्ती योजनेतील निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप लावला आहे. भाजपने या आरोपांना दुजोरा न देता तांत्रिक चुकांवर भर देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तात झालेल्या बदलांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Chandrashekhar Bawankule : चार तासांचा जनता दरबार; ७०० च्या वर निवेदने!
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीतील इतिवृत्तामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासासाठीच्या (दलित वस्ती) योजनेंतर्गत कामांच्या मुद्द्यावर तफावत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांनी केला आहे. त्यांनी या बाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सचिवांकडे तक्रार दाखल केली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात दलित वस्ती योजनेअंतर्गत मंजूर निधीनुसार जिल्हा परिषद समाजकल्याण समितीमार्फत कामांची निवड करण्यात आली. त्यानुसार समाजकल्याण अधिकाऱ्यांनी ३४८ कामांना मान्यता दिली, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ९४ कामांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर १४ जानेवारी रोजी या कामांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
यानंतर ३१ जानेवारीला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त १३ मार्चला जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. या इतिवृत्तात, दलित वस्ती योजनेंतर्गत प्रस्तावित कामांबाबत तक्रारी आल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी करून पडताळणी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्याचे नमूद आहे. तसेच ज्या गावांमध्ये कामे झाली नाहीत, त्या गावांचा समावेश करून सुधारित यादी सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
Harshawardhan Sapkal : काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु
पुढे २१ मार्चला जिल्हा परिषदेला ‘डीपीसी’ बैठकीचे नवे इतिवृत्त प्राप्त झाले. त्यातही याच प्रकारची माहिती देण्यात आली. मात्र, दोन्ही इतिवृत्तांमध्ये तफावत असल्याचा आरोप आम्रपाली खंडारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे शंका निर्माण होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा न्यायालय व पोलिसांत तक्रार दाखल करावी लागेल, असा इशारा आम्रपाली खंडारे यांनी दिला आहे.