Chandrashekhar Bawankule’s scathing criticism of Vijay Vadettiwar : त्यांनी कधीच विकासाचे राजकारण केले नाही, तर जातीजातींमध्ये तेढ निर्माण केले
Nagpur : काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना संघ समजायला खूप वेळ लागेल. ते पराभवाच्या मानसिकतेतून अजून बाहेर आलेले नाहीत. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांचा एवढा मोठा पराभव का झाला? नेहमी मतांचे लांगुनचालन केले, म्हणून त्यांचा पराभव झाला.. त्यांनी कधीच विकासाचे राजकारण केले नाही. तर नेहमी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले, असा हल्लाबोल राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
नागपुरात आज (२९) मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार यांनी संघावर केलेल्या टिकेबद्दल विचारले असता, फोडाफाडीचे राजकारण करूनच त्यांनी सत्ता भोगली आहे. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना संघ समजायला वेळ लागेल. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण घ्यावं लागेल. संघाबद्दल बोलावं एवढी उंची त्यांची नाही, असे ते म्हणाले.
सर्व सरपंचांचे स्वागत..
आज भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या अनेकांनी यापूर्वी काँग्रेससाठी काम केलं होतं. मात्र आता काँग्रेस सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसीत भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्र या संकल्पनेला साथ द्यायची आहे. भाजपच्या संघटन पर्वामध्ये या सर्वांनी मोठे योगदान दिलं आहे. मी या सर्व सरपंचाचा स्वागत करतो, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.
मोदींच्या आगमनाचा उत्साह..
संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानांच्या आगमनाचा मोठा उत्साह आहे. नरेंद्र मोदी रेशीमबाग आणि दीक्षाभूमीला जाणार आहेत. त्यानंतर आशिया खंडातल्या अत्याधुनिक नेत्र रुग्णालयाचे भूमिपूजन ते करणार आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नागपूर नगरी सज्ज असून अनेक चौकांमध्ये त्यांचे स्वागत आम्ही करणार आहोत.
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळें यांनी निभावले खऱ्या ‘पालका’चे कर्तव्य !
..तेव्हा वडेट्टीवारांनी विचारावं
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत. हा विषय छेडला असता, पाच वर्षांसाठी आम्ही निवडून आलो आहे. पाच वर्ष सरकार चालणार आहे. आत्ताशा सरकार येऊन तीनच महिने झाले आहेत. आम्ही समाजाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करतो की, जी जी आश्वासन आम्ही दिली आहे, ते आश्वासन, तो जाहीरनामा भाजप पूर्ण करेल. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, मोफत वीज असेल, लाडकी बहिणींना वाढीव अनुदान असो सर्व आश्वासनं पूर्ण केले जातील. आमचा जाहीरनामा आम्ही पूर्ण करू. पाच वर्ष संपण्याच्या तीन महिन्यांआधी वडेट्टीवार यांनी आम्हाला भेटावं आणि तेव्हा विचारावं की आमचं कोणता आश्वासन अपूर्ण राहिला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.








