Breaking

23 Gram Panchayats disqualified 103 members : २३ ग्रामपंचायतींनी १०३ सदस्यांना केले अपात्र !

Action for non-submission of cost accounts of Gram Panchayat in Akola District खर्चाचा हिशोब सादर न केल्यामुळे कारवाई

Akola निवडणूक लढवणाऱ्या व निवडून आलेल्या उमेदवारांना ठरवून दिलेल्या मुदतीत खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या १०३ सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे. विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्याने संबंधित सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत आहे. असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. या सदस्यांना पुढील पाच वर्षांपर्यंत कामकाजात सहभाग घेता येणार नाही. तसेच निवडणुकही लढता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.

निवडणूक लढविणाऱ्याने निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांत खर्चाची माहिती सादर करणे बंधनकारक आहे. १८ जानेवारी २०२१ रोजी ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर विहित मुदतीत खर्चाची माहिती सादर न करणाऱ्या व्यक्तींची यादी संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आली होती. या यादीतील ग्रामपंचायत सदस्यांना सुनावणीद्वारे आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. मात्र, सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर बार्शीटाकळी तहसीलदारांनी अहवालासह खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केली.

Akola BJP Membership : सत्तेचा उपभोग घेणारे वाढवू नका !

या प्रकरणात दाखल सर्व कागदपत्रे, अहवाल व संबंधितांच्या जबाबाचा विचार करून विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नसल्याचे सिद्ध झाले. तसेच या विलंबासाठी त्यांच्याकडे कोणतीही योग्य कारणे किंवा समर्थन आढळून आले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कारवाई केली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम १४ ब चे पोट कलम १ अन्वये तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमधील १०३ सदस्यांना अपात्र घोषित केले.

हे सदस्य ३१ डिसेंबर २०२४ पासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता ग्रामपंचायत सदस्य राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र असतील, असे आदेशात म्हटले आहे.

Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशीचे कुटुंबीय आंबेडकरांच्या भेटीला

अशी आहे अपात्र सदस्यांची संख्या
पिंजर ७, टिटवा १०, महान ५, वाघा वस्तापूर २, हातोला ८, जमकेश्वर २, कोथळी खुर्द २, भेंडी महाला ५, दोनद बु. ४, मोरगाव काकड ६, राहीत १, वडगाव ४, कानेरी सरप ६, साहीत ४, कातखेड ७, रुस्तम्माबाद १, पुनोती बु. ६, लोहगड ६, धाबा ३, खेर्डा बु. ४, राजंदा १, सिंदखेड ३, सुकळी ८ यांचा समावेश आहे.