Breaking

Bhandara Police : पोलीस दलातील बदल्यांचा आदेश निघाला !

Transfers of Police Inspectors, Sub-Inspectors in Bhandara Some complained some requested  पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या

Bhandara विधानसभा निवडणुकीनंतर भंडारा जिल्ह्यातील गृहविभागात खांदेपालट करण्यात आले आहे. कुठे रेती तस्करीबाबत ठाणेदारांचे साटेलोटे आहेत. तर कुठे कौटुंबिक कारणावरून तर कुणी विनंती केली आहे. विविध कारणांवरून पोलिस निरीक्षकांसह सहायक पोलिस निरीक्षक तथा पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी शनिवारी ४ जानेवारीला जारी केला.

तुमसर येथील पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांची साकोलीच्या पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर साकोली येथील पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांची तुमसर येथे त्याच पदावर बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले उल्हास भुसारी यांची गृह विभागातीलच पोलिस स्टेशन सायबर येथे प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. करडीचे ठाणेदार म्हणून नियुक्त असलेले सहायक पोलिस निरीक्षक विलास मुंडे यांची तुमसर येथे बदली करण्यात आली आहे.

CM Devendra Fadnavis : सर्वाधिक हत्याकांडात गृहमंत्र्यांचे शहर राज्यात तिसरे !

करडी येथे पोलिस निरीक्षक म्हणून जवाहरनगरचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांची बदली करण्यात आली आहे. भंडारा येथे सायबर शाखेत प्रभारी अधिकारी असलेले पोलिस निरीक्षक असलेले भीमाजी पाटील यांची जवाहरनगर पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. दिघोरीचे पोलिस निरीक्षक म्हणून कार्य करीत असलेले सहायक पोलिस निरीक्षक अमरदास धनदर यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक निलेश गिरी यांची दिघोरीच्या ठाणेदारपदी बदली करण्यात आली आहे. सिहोऱ्याच्या पोलिस निरीक्षकपदी असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर यांची भंडारा शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. भंडारा येथील आर्थिक गुन्हे शाखेत प्रभारी असलेले पोलिस निरीक्षक विजय कसोधन यांना सिहोऱ्याचे ठाणेदार म्हणून पाठविण्यात आले आहे.

23 Gram Panchayats disqualified 103 members : २३ ग्रामपंचायतींनी १०३ सदस्यांना केले अपात्र !

बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ रुजू व्हायचे आहे. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करावयाचा आहे. त्यानुसार बहुतांश अधिकाऱ्यांनी पदेही स्वीकारल्याचे समजते. नवीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांसह अन्य समस्यांच्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.