Breaking

Water shortage : बुलढाणा जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

 

Water scarcity looms over Buldhana district : धरणांत केवळ १५२.७८ दलघमी साठा, पाच तालुक्यांत १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Buldhana : जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु जलसाठे मिळून आजघडीला केवळ १५२.७८ दलघमी (३२.६५ टक्के) इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाच तालुक्यांतील १७ गावांमध्ये १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

मोठ्या प्रकल्पांत ३२.१८ टक्केच पाणी असल्याची माहिती विभागाने दिले. मोठे प्रकल्प: नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी या तीन मोठ्या प्रकल्पांत ७१.६६२ दलघमी (३२.१८ टक्के) पाणी उपलब्ध आहे. मध्यम प्रकल्प: ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा, उतावळी या सात प्रकल्पांत ५३.६८० दलघमी (३७.८९ टक्के) साठा आहे.
लघु प्रकल्प: जिल्ह्यातील ४१ लघु प्रकल्पांत २७.४४४ दलघमी (२६.४९ टक्के) पाणी उपलब्ध आहे.

Water Shortage : अख्ख्या जिल्ह्यातील हातपंप बंद!

पाच तालुक्यांत १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता, पाच तालुक्यांतील १७ गावांमध्ये १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात पारडी, जवळा, हिवरा साबळे, वरवंड, बोथा, पाथर्डी – प्रत्येकी १ टँकर. बुलढाणा तालुक्यात पिंपळगाव सराई, सैलानी, ढासाळवाडी, पिंपरखेड, चौथा गाव प्रत्येकी १ टँकर सुरू आहे. चिखली तालुक्यात कोलारा, श्रीकृष्णनगर, भालगाव प्रत्येकी १ टँकर. सिंदखेड राजा तालुक्यात सारगाव माळ – १ टँकर तर देऊळगाव राजा तालुक्यात अंढेरा ३ टँकर, निमखेड येथे १ टँकर सुरू आहे.

Water shortage : मोठं संकट! ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई?

अतिरिक्त उपाययोजना म्हणून १०८ गावांमध्ये ११८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील १०८ गावांत ११८ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि अपव्यय टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.