Maharashtra Medical Council : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची आज निवडणूक

Registered medical professionals should exercise their right to vote : वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी कोणते उपक्रम हाती घेणार, याकडे संपूर्ण वैद्यकीय वर्तुळाचे लक्ष

Akola : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचे मतदान आज (३ एप्रिल) होणार आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून, राज्यभरातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय परिषदेच्या व्यवस्थापनावर आणि भविष्यातील धोरणांवर या निवडणुकीचा मोठा प्रभाव पडणार असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांमध्ये या निवडणुकीबद्दल उत्सुकता आहे.

सदर निवडणुकीचे मतदान ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुरू झाले आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालू राहील. सर्वोच्च न्यायालयाने SLP क्रमांक ८५७६/२०२५ या याचिकेमध्ये महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. विद्यमान निर्वाचन अधिकाऱ्यांऐवजी नवीन निर्वाचन अधिकारी तात्काळ नियुक्त करण्याचे निर्देश २ एप्रिल रोजी देण्यात आले. या आदेशानुसार, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सुनिलकुमार धोंडे, अवर सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती नवीन निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

Sudhir Mungantiwar : भटाळीत घरांना तडे, शेती नष्ट; मुनगंटीवार जिल्हाधिकाऱ्यांसह पोहोचले थेट गावात !

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नवीन नेतृत्व कोणते धोरण अवलंबणार आणि वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी कोणते उपक्रम हाती घेणार, याकडे संपूर्ण वैद्यकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Water shortage : पुनर्वसीत श्रीरामपूरबाबत प्रशासन उदासीन

महाराष्ट्र वैद्यकीय निवडणूक-२०२५ नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याने सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी गुरुवार, ३ एप्रिल २०२५ रोजी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. योग्य उमेदवारांची निवड करून वैद्यकीय क्षेत्राच्या भविष्यासाठी सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आणि इतर संबंधित व्यावसायिकांनी आपल्या मताचा प्रभावी वापर करावा आणि या निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यावा.