Uddhav Thackeray : उबाठा बनले मुस्लिम ह्रदयसम्राट, घेतली वक्फ विरोधी भूमिका !

 

Sanjay Nirupam said that Muslim organizations thanked Mr. Uddhav Thackeray : मुस्लिम संघटनांनी जनाब उद्धव ठाकरेंचे आभार मानले

Mumbai : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करावा, यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांना सातत्याने फोन करुन दबाव टाकला, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. मुस्लिम मतांसाठी हिंदुत्वाचा त्याग करुन उद्धव ठाकरेंनी बाळसाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

वक्फ बोर्ड सुधारणा विरोधी भूमिका घेतल्याने रझा अकादमी, ऑल इंडिया उलेमा बोर्ड या संघटनांनी जनाब उद्धव ठाकरे यांचे आभार मानले, त्यामुळे उबाठा आता मुस्लिम ह्रदयसम्राट बनले आहेत, अशी खोचक टीका निरुपम यांनी यावेळी केली. मुंबईत आज (४ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार देशभक्त मुस्लिमांच्या हितासाठी आणलेल्या विधेयकाच्या बाजूने उभ राहण्याची बहुतांश उबाठा खासदारांची मानसिकता होती.

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला, म्हणाले..

पाच-पाच वेळा केले फोन..
अरविंद सावंत आणि अनिल देसाई वगळता सर्वच खासदार वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने होते. मात्र उबाठाकडून या खासदारांना पाच – पाच वेळा फोन करुन विरोधात मतदान करण्यासाठी दबाव टाकला, असा खळबळजनक दावा निरुपम यांनी केला. मुस्लिम संघटनांकडून नोटांचे आमिष आणि फंडिंगचे आश्वासन यामुळे उबाठाने वक्फ विरोधी मतदान केले, असे निरुपम म्हणाले. बाळासाहेब आयुष्यभर हिंदुंच्या हितासाठी लढले, मात्र मतांच्या लाचारीसाठी उबाठाने मुस्लिम तुष्टीकरणाला प्राधान्य दिले, अशी टीका निरुपम यांनी केली.

Uddhav Thackeray : काय..! तुम्ही मर्सीडीजचे भाव वाढवले नाहीत ?

टॅरिफवर बोलूच नये..
मुस्लिम संघटनांनी वक्फ विरोधात भूमिका घेणाऱ्या उबाठाचे जाहीर आभार मानले आहेत. याच संघटनांनी निवडणुकीत उबाठाला फंडिंग केली होती. उबाठाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मशिदीतून फतवे काढण्यात आले होते. त्याची परतफेड वक्फ विधेयकाला विरोध करुन उबाठाने केली, असे निरुपम म्हणाले. अमेरिकेच्या टॅरिफबाबत बोलणाऱ्या उबाठाने मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून ४० टक्के कमिशन खाल्ले आणि मातोश्री २ उभारले त्यांनी टॅरिफवर बोलूच नये, असेही निरुपम म्हणाले.