व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Uddhav Balasaheb Thackeray : अमरावती जिल्हा शिवसेना ठाकरे गटात खिंडार!

Uddhav Balasaheb Thackeray : अमरावती जिल्हा शिवसेना ठाकरे गटात खिंडार!

 

Amravati district Shiv Sena Thackeray faction splits : तिवसा तालुका युवती सेनेच्या तेजस्विनी वानखडेंचा शिवसेनेत प्रवेश

Amravati तिवसा तालुक्यातील उबाठा युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख तेजस्विनी दिनेश नाना वानखडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. यामुळे तिवसा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला मोठा झटका बसला आहे.

यवतमाळ येथे आयोजित शिवसेनेच्या आभार सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्क मंत्री संजय राठोड, मंत्री उदय सामंत, तसेच शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

या पक्षप्रवेशामुळे तिवसा शहरासह तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. येत्या काळात अजून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे तेजस्विनी वानखडे यांनी सांगितले. पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Manikrao Kokate : मंत्री महोदय, कास्तकाराच्या जखमेवर मीठ चोळू नका!

या वेळी शिवसेनेचे तिवसा तालुकाप्रमुख श्रीहरी बोकडे व अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. तेजस्विनी वानखडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका सुवर्णा अजय आमले, शहरप्रमुख गणेश डोळस, माजी शहरप्रमुख अजय आमले, विलास खेडकर, राजू ठाकरे, विवेक वानखडे, युवासेना उपतालुकाप्रमुख अभय वानखडे, युवासेना शहरप्रमुख अमोल गोहत्रे, पप्पू मारबदे, नंदकिशोर देशमुख, पिंटू वानखडे, भूषण देशमुख, छोटू उतखेडे, अनिल चोरे, अमोल गंधे, पोलाड काका, रमेश वानखडे, सुरेंद्र रोडगे, प्रवीण वानखडे, मंगेश हिमाने, बाळा बिजवे, आशिष पुणवटकर, अल्पेश ठाकरे, अनिल बाखडे, प्रवीण डहाके, दिनेश पुरी आदी कार्यकर्त्यांनी समावेश केला.

error: Content is protected !!