Breaking

Vidarbha Farmers : प्रलंबित कर्जमाफीसाठी ठाकरे गट आक्रमक

 

Shivsena Thackeray group aggressive for pending loan waiver : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा निषेध, प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी

Amravati निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलेल्या महायुती सरकारने सत्ता आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना (ठाकरे गट) व शेतकऱ्यांनी सोमवारी पंचवटी चौकात आक्रमक आंदोलन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध नोंदवला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत तो जाळण्यात आला.

पंचवटी चौकात झालेल्या या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक १५ मिनिटे ठप्प झाली. पंचवटी चौक हा नागपूरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला.

Vidarbha Farmers : विमा कंपन्यांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा संताप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘शेतकऱ्यांनी कर्ज भरावे’ असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अनेक वर्षांपासून शासन शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. आंदोलनामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Congress review meeting in Chikhali : काँग्रेसला टाळायचीये विधानसभेतील पुनरावृत्ती!

हे आंदोलन जिल्हाप्रमुख पराग गुडघे यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख मनोज कडू, नरेंद्र पडोळे, प्रदीप बाजड, राजेश बंड, प्रफुल भोजने, डॉ. नरेंद्र निर्मळ, विलास माहुरे, नितीन हटवार, कपिल देशमुख, रामदास बैलमारे, प्रमोद कोहळे, दिलीप केणे, कुमार यादव, संजय चौधरी, सुरेश जूनघरे, नीलेश मुंदाने, शंकर वाटाणे, आश्विन नागे, शैलेश पांडे, समाधान गाडगे, मुरली पडोळे, अक्षय पावडे, सुरेश काकडे, शाम शेंडे, ऋषिकेश सगणे, विनोद काळे, संजय पिंगळे, दिलीप काळे, प्रदीप गौरखेडे, सुनील राऊत, विजय ठाकरे, पंजाबराव तायवाडे, नितीन तारेकर, दिलीप काकडे, विनोद मंडळकर, शरद वानखडे, सचिन ठाकरे, वैभव सवाई आदींची उपस्थिती होती.