The government stopped the funds, the administration unable to draw salaries : NHM मध्ये आर्थिक अडचण; अमरावतीत ३ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
Amravati राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (NHM) कार्यरत सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत कार्यरत २ हजार आशा वर्कर्स आणि सुमारे १ हजार डॉक्टर, नर्सेस, समुपदेशक आणि इतर कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असून, दोन-चार दिवसांत तो प्राप्त होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच रखडलेले वेतन अदा करण्यात येईल, असे ते म्हणाले.
एनएचएम अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर, नर्स, समुपदेशक, वार्डबॉय आणि आशा वर्कर्स यांचा समावेश आहे.
Harshawardhan Sapkal : जिझिया कराच्या आड भाजपकडून जनतेची लूट!
राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी ही योजना सुरू केली असली, तरी निधीच्या कमतरतेमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वेतन वितरणास अडथळा निर्माण झाला आहे. राज्यभरातील इतर जिल्ह्यांनाही निधी उशिरा मिळत असल्याची माहिती असून, अमरावती जिल्ह्याला आवश्यक निधी वेळेत मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
MLA Pravin Tayade : वाळू तस्करांना रोखण्यासाठी आमदारच उतरले रस्त्यावर!
२ हजार आशा वर्कर्स आणि १ हजार डॉक्टर, नर्स, समुपदेशक, वार्डबॉय असे एकूण ३ हजार कर्मचारी आहेत. वेतनासाठी ३.५ ते ४ कोटी रुपये निधी दरमहा लागतो. यासोबत यंत्रसामग्री व इतर खर्च ६ ते ६.५ कोटी रुपयांच्या घरात आहे. अशी एकूण १० कोटी रुपयांची आवश्यकता दर महिन्याला असते.
आता फेब्रुवारीचे वेतन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळाले. मार्च महिन्याचे वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे निधी मिळाल्यानंतरच वेतन देण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.