Incident at Rainbow Swimming Pool in Chikhli Taluka Sports Complex : मृतक दोघेही उत्तम पोहणारे होते, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Chikhali – Buldhana : चिखलीतील तालुका क्रीडा संकुलातील रेनबो स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुण विद्यार्थ्यांचा बुधवारी (9 एप्रिल) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. मृत विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी चिखलीत आलेले होते.
मृतांमध्ये सूरज सुनील पानखडे (रा. गेवराई, जि. बीड) आणि विवेक अरुण वायले (रा. पाथर्डी, जि. अकोला) यांचा समावेश आहे. हे दोघेही स्थानिक सु.रा. चुनावाले आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस द्वितीय वर्षाचे विद्यार्थी होते. त्यांचे वय अंदाजे २१ ते २२ वर्ष होते. संध्याकाळच्या सुमारास हे दोघे इतर चार मित्रांसोबत पोहण्यासाठी रेनबो जलतरण तलावात गेले होते.
Punce case impact in Bhandara : धर्मादाय रुग्णालयांची झडती, प्रशासन अलर्ट मोडवर!
तलावात अंदाजे ४० ते ४५ पोहणारे लोक होते. साधारणतः ८ फूट खोल असलेल्या तलावात एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक असल्याने दोघे विद्यार्थी पाण्यात बुडाल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. उशीराने ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. जवळील भराड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
Pune Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आज होणार सादर !
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह..
तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे संचालन विजय वाळेकर यांना तीन वर्षांसाठी दिले आहे. त्यांच्याकडून चार पुरुष व दोन महिला अशा एकूण सहा जीवनरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, तलावात एकाचवेळी मोठ्या संख्येने लोक असतानाही दोन युवकांचा अशाप्रकारे मृत्यू झाला. त्यामुळे सुरक्षेच्या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, मृतक दोघेही उत्तम पोहणारे होते, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली आहे