Breaking

JyotiRao Phule Film : ज्योतिराव फुले सिनेमा जसाच्या तसा प्रदर्शीत करा अन् तोही टॅक्स फ्री !

 

NCP district president Praveen Kunte said that Jyotirao Phule’s movie should be screened as it is and that too tax free : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध

Nagpur : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित सिनेमा कुठलीही सेन्सॉरशीप न करता जसा आहे तसाच प्रदर्शित करावा. शासनाने सदर चित्रपट टॅक्स फ्री करावा असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंजूर केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल (११ एप्रिल) गणेशपेठ येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला.

नागपुर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला सलील देशमुख , माजी आमदार विजय घोडमारे, माजी आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांना मिळालेला निधी कर्ज खात्यात वळवू नका !

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमुक्तीवरून शेतकऱ्यांबद्दल अवमान जनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. नव्या पिढीमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी समाज प्रबोधनाचा परिसंवाद आयोजित करण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला .

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली जाते. काल झालेल्या बैठकीत तालुकानिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेतला गेला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका व नगर पंचायत निवडणूक लढविण्याच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली .

School exams : परीक्षेच्या काळात वीज खंडित : विद्यार्थ्यांचे हाल, विभागांचे दुर्लक्ष!

बैठकीला प्रदेश सरचिटणीस अनिल साठोने ,महिला जिल्हाध्यक्ष डॉ.वैशाली टालाटूले, रश्मी जामदार, सारिका ढोमने, रमेश लांजेवार, लहू घुग्गुस्कर,उत्तम पराते, दिनेश साळवे, कपिल वानखेडे, नाना केने, वैभव दळवे, ओम खत्री,श्याम वाडीभस्मे, गणेश चौधरी, नामदेव लामपुसे, रूद्र धाकडे, प्रशांत सरोदे, मंगेश चौरपगार, रोशन जीवतोडे, तुकाराम फलके, अतुल कडू, वेदांत वासाड आदी उपस्थित होते.