Breaking

Yavatmal District Central Cooperative Bank : जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकीय भूकंप होणार ?

A motion of no confidence can be brought against the President of Yavatmal District Central Cooperative Bank : अध्यक्षांविरोधात येऊ शकतो अविश्वास प्रस्ताव

Yavatmal जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कुठल्याही क्षणी राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी स्थिती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दोन वर्षांपासून राजकीय भुकंपाचा केंद्रबिंदू ठरत आहे. २०२३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी राजीनामा द्यावा म्हणून काही संचालकांनी एकत्र येत त्यांचा राजीनामा मागितला होता. आता विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, यासाठी जवळपास १७ संचालक आग्रही असल्याची माहिती आहे.

अध्यक्षांनी राजीनामा न दिल्यास अविश्वास दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जवळपास १४ संचालकांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याची माहिती आहे. गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर काही संचालकांनी अध्यक्ष मनीष पाटील यांना थेट राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून दोन दिवसांनी निर्णय कळवू, असे सांगितले.

A perverse psychiatrist in Nagpur : मानसोपचारतज्ज्ञाची आणखी प्रकरणं येताहेत पुढे !

अध्यक्षांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणण्याची तयारी काहींनी केली आहे. अविश्वास प्रस्तावावर १४ संचालकांच्या स्वाक्षरी झाल्याची माहिती आहेत. आणखी पाच संचालकही स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यमान अध्यक्ष मनीष पाटील यांच्याविरोधात सर्वच संचालक एकत्र आल्याचे दिसून येत आहे.

एनपीए कमी करण्यात अपयश
बँकेचा वाढलेला ‘एनपीए’ कमी करण्यात अध्यक्ष आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका नाराज संचालकांच्या चर्चेत होता. आगामी काळात शेतकऱ्यांना वाटप करायचे पीक कर्ज. एम.एस. बँकेकडे असलेली रक्कम. यासाठी प्रयत्न केला नसल्याचा आरोपही संचालकांचा आहे.

CM Devendra Fadnavis : आपल्या मूल्यांमध्ये विज्ञाननिष्ठता आहे हे विसरू नका

सरकारला शरण जावेच लागेल
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. यामुळे बँक वाचवायची असल्यास सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाण्याशिवाय गत्यंतर नाही, असे आक्षेप घेणाऱ्या संचालकांचे म्हणणे आहे. यावर चर्चा आणि स्वाक्षरी करण्यासाठी १६ जानेवारीला विश्राम गृह येथे काही संचालकांची बैठक झाली. त्यांनी शुक्रवारी १७ जानेवारीला अमरावती विभागीय सहनिबंधकांकडे अविश्वास दाखल करण्याची तयारी पूर्ण केली आहे, असे कळते.

किती संचालकांवर अविश्वास?
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष टिकाराम कोंगरे राजीनामा देणार नव्हते. हे माहिती असल्याने काँग्रेसने अविश्वास प्रस्तावाची तयारी सुरु केली होती. त्यावेळी खासगी हॉटेलात नेते तसेच संचालकांची बैठकही झाली. तेथे अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी घेण्यात आल्या. त्यावेळी १५ संचालकांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. नंतर कोंगरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मनीष पाटील यांची २५ सप्टेंबर २०२३ रोजी अध्यक्षपदी निवड झाली. आता त्यांच्यावरही अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारी सुरू आहे.