Fear of tigress has spread in five villages : शावकाचा शोध घेण्यासाठी मारते येरझारा; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Wardha शावकाचा अपघातात झालेला मृत्यू वाघीण अद्याप विसरलेली नाही. तिने सध्या पाच गावांमधील लोकांचं जगणं हैराण करून सोडलं आहे. शावकाचा अपघात झाला त्याच ठिकाणी ती आपल्या दुसऱ्या पिल्लासह येरझारा मारत असते. तिच्या डरकाळ्यांनी पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने लावलेल्या २९ ट्रॅप कॅमेऱ्यांचा तपास करून वाघिणीची स्थिती जाणून घेतली जात आहे. ज्या ठिकाणी शावकाचा अपघात झाला त्या ठिकाणी वाघीण येरझारा मारून शावकाचा शोध घेत असल्याचे बोलले जाते आहे. परिसरातील पाच गावांच्या वेशीवर वाघिणीच्या डरकाळया ऐकू येत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
The disabled will be self-reliant : दिव्यांग होणार स्वावलंबी!
समुद्रपूर तालुक्यातील धोंडगाव येथे शिवारात अपघातात वाघिणीच्या शावकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चवताळलेल्या या वाघिणीचा तिच्या शावकासह शेतशिवारात मुक्त संचार सुरू आहे. गावालगत वाघिणीच्या पायाचे ठसे मिळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धोंडगाव, मजरा, शिरपूर, भवानपूर, साखरबाहुली या पाच गावांतील शेतशिवारातील शेतीकामे प्रभावित झाली आहेत.
शनिवार, २५ जानेवारीला धोंडगाव शिवारातील प्रशांत कोल्हे यांच्या शेतात वाघिणीचे पगमार्क आढळून आले. वनविभागाच्या पथकाने पाहणी केली. पोलिसांसह वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, वाघिणीचे लोकेशन आढळून आले नसल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.
धोंडगाव स्मशानभूमी परिसरात वाघिणीने एका गायीवर हल्ला चढवून दोन दिवसांपूर्वी ठार केले होते. सध्या ही वाघीण आपल्या शावकासह याच परिसरात भ्रमंती करीत आहे. वनविभागाचे पथक मागावर आहे. सैरभैर शिवारात फिरणारी वाघीण आणि परिसरातील दहशतीचे वातावरण असे चित्र या भागात आहे.
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री म्हणतात, ‘रोजगार वाढवणारा अर्थसंकल्प’
त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांनी खबरदारी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.