Breaking

A woman’s condition deteriorated due to negligence of doctors during delivery : मातेच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना पाठवले रजेवर

 

After the death of the mother, the doctor was sent on leave : तपासासाठी समिती; अहवालानंतरच दोषींवर कारवाई

Gondia अर्जुनीच्या मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेची प्रकृती बिघडली होती. तब्बल 25 दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी (दि. 31) नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुटुंबीय आणि संतप्त नागरिकांच्या विरोधानंतर प्रशासनाने या प्रकरणाशी संबंधित डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

Dr Neelam Gorhe : शेतकरी म्हणाले, ‘ताई तुम्ही होत्या म्हणून…’

रागिणी अनिल मसराम यांना प्रसूतीसाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची नॉर्मल प्रसूती झाली. परंतु, प्रसूतीनंतर चुकीच्या पद्धतीने टाके लावल्याने महिलेच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. नागपुरात दाखल केल्यानंतर, टाके लावताना मुत्र विसर्जन मार्गातील नळी फुटली. शरीरात इन्फेक्शन झाले. त्यामुळे महिलेच्या किडनी आणि मेंदूवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

The body was found suspicious condition : संतप्त नातेवाईकांनी चौकातच दिला ठिय्या !

 

25 दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी (दि. 31) महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पीडित कुटुंबाला मदतीची मागणी

या घटनेनंतर संबंधित डॉक्टरला निलंबित करावे. पीडित कुटुंबाला मदत करण्याची मागणी करण्यात आली. कुटुंबीय व नागरिकांनी निदर्शने केली. यावेळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जयस्वाल, डॉ. मोहबे यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून सदर डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठवले. तसेच चौकशी समिती स्थापन करून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचे आश्वासनही देण्यात आले होते.