Breaking

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंना सहआरोपी करा!

 

Make Dhananjay Munde a co-accused : आदित्य ठाकरे यांची मागणी; आझमींना फडणविसांनीच फोन केला असेल

Mumbai मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये Santosh Deshmukh murder case माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP Ajit Pawar नेते धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणावरून धनंजय मुंडे यांनी आज मंत्रीपदाचा राजीनामा दिला. परंतु यानंतरही विरोधकांकडून मुंडे यांच्यावर असलेला रोख दूर झालेला नाही. संतोष देशमुख खून प्रकरणातील काही अमानवीय छायाचित्रे प्रकाशित झाल्यानंतर महराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ राजीनामा होऊ चालणार नाही तर नवीन आरोपपत्र पोलिसांनी दाखल करावे यात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

Harshwardhan Sapkal : भाजप म्हणजे ‘मुह में राम आणि बगल में छुरी’!

आझमीला फडणवीसांची फूस

अधिवेशनामध्ये राज्य सरकारला धारेवर धरलेले असताना अबु आझमी यांनी अचानकपणे औरंगजेब दिलेले विधान हे नुरा कुस्तीचा प्रकार असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. शिवाजी महाराजांचा अपमान राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकरने केलेला आहे. यावर कोणतीही कारवाई केली नाही. संतोष देशमुख खून  प्रकरणावरून सरकारला तोंड दाखविणे कठीण झाले. या स्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अबु आझमी यांना फोन केला असेल. त्यांनी औरंगजेबबद्दल विधान करण्यास सांगितले असेल, असा दावा ठाकरे यांनी केला आहे.

MLA Randhir Sawarkar : शिवसेनेच्या मंत्र्याकडे असलेल्या खात्यात गैरव्यवहार, भाजप नेत्याचा आरोप

भाजपची B Team

समाजवादी पार्टी ही भाजपची बी टिम आहे, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. भाजपला वाचविण्यासाठी सपाचे नेते अबु आझमी नेहमीच तयार असतात. अबु आझमीवर कारवाई करण्यास  सरकार कां घाबरत आहे. सभागृहात बहुमत आहे. विधानसभेचे अध्यक्ष भाजपचे आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे, तर आमदार अबु आझमीवर कारवाई  का केली जात नाही, असा सवालही आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे